युजीसीच्या सर्व याचिकांवर सोमवारी एकत्रित सुणावणी होणार : सर्वोच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यारण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी (ता.२३) न्यायाधीश नागेश राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  

नवी दिल्ली : 'विद्यापीठ अनुदान आयोगाने  घेतलेल्या निर्णयाविरोधात विविध संघटना, विद्यार्थी आणि काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या सर्व याचिकांवर सोमवारी (ता.२७) एकत्रिक सुनावणी केली जाणार आहे' अशी माहिती सर्वोच्च न्यायालयांनी याचिकाकर्त्यांना दिली. सर्वोच्च न्यायालय सोमवारी काय निर्णय देणार? याकडे सर्व विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, विविध संघटनांचे लक्ष लागले आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक त्तत्वे जाहीर केले. आणि देशातली ७५५ विद्यापीठांना पत्र पाठवून सप्टेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या. मात्र देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोना काळात परीक्षा घेणे शक्य नाही, त्यामुळे राज्य सकराने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आणि सरासरी मुल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावा, असा आदेश विद्यापीठांना दिला. युजीसीने राज्याचा आदेश डावळून परीक्षा घेणे विद्यापीठांना बंधनकार असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यारण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी (ता.२३) न्यायाधीश नागेश राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  

'सामाजिक कार्यकर्ते प्रणिथ के, ३१ विद्यार्थी आणि काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात युजीसीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिका एकत्रिक करुन सोमवारी न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी केली जाईल', असा आदेश न्यायाधीश नागेश राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने दिला. 

'ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात वीज सुरळीत राहत नाही, अनेक ठिकाणी इंटरनेट चालत नाही, बहुतांश महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी साहित्य उपलब्ध नाहीत. कोरोना काळात ऑफलाईन परीक्षा आयोजिक केल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशा परिस्थितीत परीक्षा घेणे अशक्य आहे' अशी भुमीका युवा सेनेने न्यायालयात मांडली होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News