समस्त शिंदे राजघराणे भाजप सेवेत रुजू

निवृत्ती बाबर
Wednesday, 11 March 2020
  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्षाचे नेते दिग्विजय सिंग या जोडगोळीने ज्योतिरादित्य यांचे पंख छाटले.
  • काँग्रेसमध्ये तरुण तडफदार नेता पुन्हा एकदा अपयशी ठरला काय काँग्रेससाठी नवीन नाही, मग ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी असो नाही तर सचिन पायलट. 

2018 मध्ये मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने काठावर पास होऊन सरकार स्थापन केले. गेल्या सव्वा वर्षातील काँग्रेसमधील अंतर्गत घुसमट ऐन होळीच्या दिवशी बाहेर आली, आणि संपूर्ण भारत होळीत रंगत असताना काँग्रेसला मात्र वेगळे रंग दिसू लागले. निम्मित होते, मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा..!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि पक्षाचे नेते दिग्विजय सिंग या जोडगोळीने ज्योतिरादित्य यांचे पंख छाटले. काँग्रेसमध्ये तरुण तडफदार नेता पुन्हा एकदा अपयशी ठरला काय काँग्रेससाठी नवीन नाही, मग ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी असो नाही तर सचिन पायलट. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. परंतु शिंदे हे भाजपमध्ये जाणारे त्यांच्या घराण्यातील पहिले नेते नाहीत. ज्योतिरादित्य शिंदे हे एका राज घराण्यातील आहेत. त्यांची आजी राजमाता विजयाराजे या भाजपच्या एक संस्थापकीय सदस्य होत्या. त्यांचीच कन्या वसुंधराराजे यांच्याकडे राजस्थानची जहागीर बराच काळ होती. त्यांची बहीण आणि ज्योतिरादित्य यांची दुसरी आत्या यशोधराराजे यादेखील भाजप नेत्या.

वसुंधराराजे यांचे चिरंजीव दुष्यंत हे भाजपचे खासदार. त्यांची आत्या माया सिंग याही भाजप नेत्या. त्या शिवराजसिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळात होत्या. यास अपवाद होते फक्त माधवराव शिंदे. ते काल हयात असते तर 75 वर्षाचे असते आणि मंगळवरीच म्हणजे 10 मार्चला त्यांचा जन्मदिन. त्याच मुहूर्ताचे औचित्य ज्योतिरादित्य यांनी साधले आणि ते भाजपवासी झाले. यामुळे समस्त शिंदे राजघराणे भाजप सेवेत रुजू झाले असे म्हणता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News