सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या वतिने 10वी 12 वी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न झाला.

सावंतवाडी - स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या नुतन कार्यालयाचं नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. यावेळी 10वी 12 वी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या सावंतवाडी बाजारपेठेतील कार्यालयाचं  नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं. यावेळी प्रतिष्ठानच्या स्वच्छंद क्लासेसचा शुभारंभही करण्यात आला.

तसेच आपण व्यक्त होऊया समितीशी संबंधित असलेल्या दहावी, बारावी व पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या झाला. यामध्ये दहावीतील केतकी सावंत, सयानी धुरी, सेजल मेस्त्री, सना दरगावाला, देवयानी केसरकर, बारावी मिहिर मोंडकर, जान्हवी सावंत, सर्वेश राऊळ, प्रिया नंदेश्वर, अनुजा कुडतरकर, गार्गी शेटये, श्रीया सामंत, अनुष्का गोरे, वैष्णवी नाटलेकर तर अबरार शेख, जागृती कवठणकर, नम्रता कोलगावकर, उदय गावडे, आत्माराम धुरी, हर्षा सावंत, ओमकार शिंगोटे, प्रणाली राऊळ, नेहा शेख, श्रद्धा मेस्त्री, कविता कलांगण, मंथन सावंत, समीर म्हाडगूत या पदवीधर तसेच डिटीपीत प्राविण्य मिळवलेल्या लक्ष्मण तळवणेकर आदींचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी  स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या पश्चात देखील  प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा वारसा अविरत चालू असल्याचं पाहून अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. याप्रसंगी नगरसेवक आनंद नेवगी, प्रा. गिरीधर पराजपे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सागर चव्हाण, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, अण्णा देसाई, ॲड. शामराव सावंत, संस्थेचे सचिव सुभानराव भोसले, प्रा. एल. पी पाटील, केदार म्हसकर, मानसी भोसले, संजना ओटवणेकर, संतोष गांवस, प्रा. व्ही.बी.नाईक, अर्चना फाउंडेशनचे रामदास गवस, सोमा सावंत, नमिता भोसले, सौ. पार्सेकर, संदीप जंगले, कौस्तुभ गावडे, विनय वाडकर, न्हानू ठाकूर, चैतन्य गावडे, समृद्धी सावंत, पंकज गुजराथी, विकास गुजराथी, सपना तुळसकर, भूषण आरोसकर, मिनल सरनाईक, ओंकार सरनाईक, रामचंद्र राणे यांसह आपण व्यक्त होऊया समितीचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.संगीत सद्गुरु विद्यालयानं ध्वनीसंयोजन केल्याबद्दल मानले आभार.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मितल धुरी, प्रास्ताविक विनायक गांवस, तर आभार निरज भोसले यांनी मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News