लग्नाच्या तारखेविषयी आलियाने केला मोठा खुलासा 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 20 February 2020

गेल्या काही दिवसांपासून तर  लग्नाच्या तारखेबद्द्ल रणवीर-आलियाचे नाव भलतेच ट्रोल होत आहेत

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अशी ओळख निर्माण करणारा रणवीर कपूर हा त्याच्या नात्याविषयी नेहमीच चर्चेत असतो.सध्या आलिया भट्ट बरोबर असलेल्या नात्यामुळे तर तो भलताच प्रकाशझोतात आला आहे.मात्र आता रणवीर-आलिया यांच्या थेट लग्नाविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तर  लग्नाच्या तारखेबद्द्ल रणवीर-आलियाचे नाव भलतेच ट्रोल होत आहेत. या दोघांच्या लग्नाची तारीख तर प्रसारमाध्यांनी सोशल मीडियावर जाहीर देखील करून टाकली. या सर्व घडामोडीबाबत आलिया भट्टला विचारले असता तिने यावर मात्र सणसणीत प्रतिक्रिया देत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला.

काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांवर या दोघांच्या लग्नाची पत्रिका दाखवण्यात आली होती. या पत्रिकेबद्दल विचारले असता  या सर्व निराधार बातम्या असल्याचे जाहीर केलं.माझ्या लग्नाच्या तारखेबद्दल मी अनेक बातम्या ऐकल्या आहेत. मात्र ह्या प्रकारच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे तिने नमूद केले.  तसेच रणवीर कपूर हा चांगला मुलगा आहे. मी जेव्हा लग्नाच्या बेडीत आडके तेव्हा प्रसारमाध्यमांना नक्की सांगेन. असे सांगत रणवीरसोबत लग्नाच्या बातमीबद्दल आलियाने प्रतिक्रिया दिली 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News