'या' शोमध्ये अली विशेष भूमिकेत

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 February 2019

     ‘मिर्झापूर’च्या यशानंतर अली फजलने ‘प्रस्थानम’ आणि ‘मीलन टॉकीज’ हे दोन मोठे प्रोजेक्‍ट खिशात घातले होते. आता तो ‘दिया मिर्झा’ आणि ‘अप्लाऊज एन्टरटेंन्मेंट’ची निर्मिती असलेल्या ‘माईंड द मल्होत्राज्‌’ या शोमध्ये एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

     दिया मिर्झाचे पती साहिल संघा हे या शोचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘ला फेमिग्लिया’ या इस्राईलच्या शोवर हा  शो आधारित आहे. ही कथा दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका कुटुंबाची आहे. त्यांच्याकडे खूश राहण्याची अनेक कारणे आहेत.

   तेवढीच कारणे त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्यासाठीही आहेत. दिया आणि साहिल यांच्याशी असलेल्या मैत्रीखातर या शोमध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्याचे अलीने सांगितले.

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News