एका चित्रपटासाठी अक्षय घेतो 'इतकं' मानधन,किंमत ऐकून थक्क व्हाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

 अक्षय कुमारने एका चित्रपटासाठी इतकी फी मागितली आहे की, तेवढ्या पैशांमध्ये एक संपूर्ण चित्रपट तयार होऊ शकेल. 

मुंबई : बॉलीवूडमध्ये एका वर्षात ४ ते ५ चित्रपट करणारा एकमेव अभिनेता म्हणजेच अक्षय कुमार. त्यामुळेच अक्षय कुमार हा आपल्या कामात नेहमीच व्यस्त असतो. २०१९ मध्ये अक्षय कुमारचे केसरी, हाऊसफुल, मिशन मंगल आणि गुड न्युज यासारखे चित्रपट हिट ठरले. अक्षय कुमारचा प्रत्येक येणार चित्रपट हा हिट ठरतो आणि बॉक्सऑफीवर तुफान कमाई करत असतो.केवळ अक्षय कुमारच्या नावानेच थेटरमध्ये गर्दी होते. तसेच तो १०० कोटींचे मानधन मिळविण्याच्या योग्य असल्याचे त्याच्या टीमने सांगितले आहे.  आणि त्यामुळेच की काय सध्या अक्षय कुमारने त्याची फी वाढवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,यावर्षी म्हणजेच २०२०मध्ये अक्षय पूर्णपणे चित्रपटाच्या कामात व्यस्त राहणार आहे.यावर्षीही त्याच्याकडे अनेक चित्रपट आहे. परंतु यावेळी अक्षय कुमारने एका चित्रपटासाठी इतकी फी मागितली आहे की, तेवढ्या पैशांमध्ये एक संपूर्ण चित्रपट तयार होऊ शकेल. 

हेही वाचा: 'मन्नत' भाड्याने देणार का? प्रश्नावर शाहरुखने दिलं 'असं' उत्तर

https://www.yinbuzz.com/will-you-rent-mannat-question-shah-rukh-gave-answer-23652

हा चित्रपट आनंद एल राय यांचा असून अक्षय कुमारने या चित्रपटासाठी तब्बल १२० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम पाहून अनेक दिग्दर्शक आश्चर्यचकित झाले आहेत. पण या गोष्टीवर अक्षयने किंवा त्याच्या टीमने कोणत्याही प्रकारचा शिक्कामोर्तब केला नसल्याचे सांगितले जात आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News