'या' दिवशी अक्षय कुमारचा  'Into The Wild' प्रीमियर प्रदर्शित होणार; पाहा ट्रेलर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020

स्कव्हरी चॅनेलवर प्रदर्शिक होणारा 'इनटू द वाइल्ड विथ बियर गिल्स' हा कार्यक्रम जगभर प्रसिद्ध आहे. या कार्याक्रमात आता खिलाडी स्टंटबाजी करताना दिसणार आहे.

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पिळदार शरीर आणि स्टंटबाजीसाठी ओळखला जातो. डिस्कव्हरी चॅनेलवर प्रदर्शिक होणारा 'इनटू द वाइल्ड विथ बियर गिल्स' हा कार्यक्रम जगभर प्रसिद्ध आहे. या कार्याक्रमात आता खिलाडी स्टंटबाजी करताना दिसणार आहे. अक्षय कुमारचा कार्यक्रम केव्हा प्रसिद्ध होणार याची उत्सुक्ता प्रेक्षकांना लागली होती.

अक्षय कुमारने एक ट्विट करुन कार्यक्रमाचे ट्रेलर आपल्या फॉ़न्सना शेअर केल. आणि 11 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचा प्रीमियर डिस्कव्हरी चॅनलवर प्रसिद्ध होणार असल्याची माहिती दिली. 14 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा हा प्रीमियर पाहायला मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुक्ता आता शिगेला पोहचली आहे.

अक्षण कुमारने 'इनटू द वाइल्ड विथ बियर गिल्स' कार्यक्रमासाठी परीक्षम घेतले. मोठ्या संकटाशी सामना करण्याचा अनुभव घेतला. 'मी कल्पना केली नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागेल. मात्र हा अनुभवर फारच रोमांचकारी होता' असे अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये सांगीतले.भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार या तिघांना शोमध्ये संधी मिळाली आहे, त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे

नदी पार करताना मगरीचा हल्ला अक्षयने परतावून लागला. पुढे हत्तीसोबत दोन हात करुन अक्षयने खिलडी असल्याचे सिद्ध करुन दाखवले, हा ट्रेलर पाहून किती भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला असेल याचा अंदाज प्रेक्षकांना येतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News