अक्षयकुमारचा नवा चित्रपट ‘सूर्यवंशी’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या पोलिसी कथांच्याच प्रेमात दिसतो. ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’नंतर तो ‘सूर्यवंशी’ घेऊन येतोय, पण इथे त्याचा फेव्हरिट अजय देवगण मुख्य भूमिकेत नाही. सध्याचा ‘मिडास राजा’ असलेला अक्षयकुमार ‘सूर्यवंशी’च्या रूपात दिसणार आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रसिद्ध झाला.

‘आया पोलिस... सूर्यवंशी’ अशा आवेशात पोलिसी खाक्‍यातल्या अक्षयची एंट्री ॲक्‍शनपॅक्‍ड सिनेमाची वर्दी देतेय. रोहितच्या स्टाईलने गाड्याही इकडून तिकडे उडताहेत. अक्षय भरधाव सुपरबाईकवर स्वार झालाय. सिनेमातील हाणामारीची दृष्यं प्रभावी वाटताहेत. हिंदी-मराठी कलाकारांची फौजही दिसतेय. कॉमेडीचा तडका अन्‌ ॲक्‍शनचा धमाका असं रोहितच्या सिनेमाचं वैशिष्ट्य. एखादा संदेशही असेलच.

विशेष म्हणजे बऱ्याच काळाने कतरिना पडद्यावर अक्षयची नायिका झालीय. दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. सोबत रणवीर सिंग आणि अजय देवगणचा तडका आहेच. ‘सिंबा’मध्ये अजयची क्‍लायमॅक्‍सला सिंघम स्टाईल धडाकेबाज एंट्री होती. ‘सूर्यवंशी’मध्ये ‘सिंबा’ रणवीर आणि अजय दोघेही दिसताहेत.

अक्षयबरोबर दोघे हातात रायफल घेऊन दुश्‍मनांना लोळवताहेत... आणखी काय हवं पिटातल्या प्रेक्षकांना! अनुभवी हिमेश रेशमियाच्या बरोबरीने आजचे संगीताचे जादूगार गुरू रंधावा आणि तनिश बागची यांनी सिनेमाची गाणी केलीत.

जुन्या गाजलेल्या ‘टिप टिप बरसा पानी...’ आणि ‘ना जा ना जा मित्रा’ गाण्याचं रिक्रिएशन आताच म्युझिक चॅटमध्ये टॉपला आहे. दोन्ही गाणी सिनेमाची यूएसपी ठरतील, असं दिसतंय. रोहित कोणता मसाला आणतोय ते २७ मार्चला कळेलच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News