अक्षय कुमार म्हणाला, 'याच्या'मुळे सोडावा लागला 'फूल और कांटे'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचवेळी मीडियाशी बोलताना अक्षय कुमारने सांगितले, तो १९९१ साली आलेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड झाली होती. 

अजय देवगण आणि अक्षय कुमार हे दोघेही रोहित  शेट्टीच्या 'सूर्यवंशी' मध्ये  ATS ऑफिसरची भूमिका करताना पाहायला मिळणार आहेत. ते  दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र असून एकमेकांशी स्क्रीन वाटून घेताना पण दिसतात. पण ते एकमेकांशी एकाच रोल साठी भांडले आहेत हे तुम्हाला माहित आहे का?

सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचवेळी मीडियाशी बोलताना अक्षय कुमारने सांगितले कि तो १९९१ साली आलेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड झाली होती. परंतु अजय देवगणमुळे त्याला या चित्रपटातून बाहेर काढले. अजय देवगणचा पहिला  चित्रपट 'फूल और कांटे' आणि  अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'सौगंध' हे दोन्ही चित्रपट एकाच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

अजयची आपला मित्र म्हणून ओळख करून देताना कार्यक्रमात अक्षय कुमार म्हणाला,"आम्ही दोघांनी आमच्या करिअरची सुरुवात एकाच वेळी केली.सुरवातीला आम्ही दोघेही एकाच रोलसाठी भांडलो होतो.फूल और कांटे साठी माझी निवड झाली होती पण त्यानंतर अजय देवगणने मला बाहेर काढून  माझा रोल स्वतः घेतला. त्यानंतर तो म्हणाला,"मी आणि अजय तेव्हापासून खूप मोठा प्रवास करून इथपर्यन्त पोहोचलो आहोत. आम्ही एकमेकांसोबत सुहाग,खाकी,इन्सान सारखे बरेच चित्रपट केलेले आहेत." त्याने चाहत्यांना एकमेकांशी न भांडण्याचं आवाहन देखील केलं.

अक्षय कुमार आता रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात  DCP च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर अजय देवगण हा इन्स्पेक्टर बाजीराव सिंघम तर रणवीर सिंग हा इन्स्पेक्टर संग्राम भालेरावच्या गेस्ट अँपिअरन्स मध्ये दिसणार आहे. चित्रपटात कतरीना कैफ अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. कतरीना आणि अक्षय दोघे फराह खानच्या तीस मार खान नंतर प्रथमच एकत्र येत आहेत.हा चित्रपट २४ मार्च ला प्रेक्षागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News