तृतीयपंथीयांसाठी अक्षय कुमारने घेतला कौतुकास्पद निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

मुंबई : अक्षय कुमार आपल्या आगामी चित्रपट सूर्यवंशीसाठी प्रमोशन  करताना दिसत आहे. मात्र त्यासोबतच एका वेगळ्या कारणामुळे तो अधिक चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारचा "लक्ष्मी बॉम्ब" नावाचा चित्रपट काही महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने अक्षय कुमार याने एक मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

"लक्ष्मी बॉम्ब" चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आणि अक्षय कुमार यांनी एकत्रितरित्या चेन्नईतील तृतीयपंथीयांसाठी घर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कामासाठी तब्ब्ल दीड कोटींचे दान करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे तृतीयपंथीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

फक्त तृतीयपंथीयांसाठी असणारी चेन्नईतील ही पहिली इमारत असणार आहे. दिग्दर्शक राघव याने याबाबत फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेअर केली आहे. "आमच्या दोघांमधील विश्वासाला आता १५ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. तृतीयपंथीयांना घर दिल्यास त्यांचा विकास होईल, आम्ही खूप आनंदी आहोत, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. 

अक्षय आणि राघव यांनी घेतलेल्या या निर्णयाचं तृतीयपंथीयांनी देखील स्वागत केलं आहे. यासाठी अधिकाणी हातभार लावण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. अक्षयच्या 'सूर्यवंशी'नंतर "लक्ष्मी बॉम्ब" हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो तृतीयपंथीयांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत, कियारा अडवाणी, तुषार कपूर तसेच शबीना खान देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News