अक्षयकुमार ठरला २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

२०१९ मध्ये त्याने एकापाठोपाठ एक ‘केसरी’, ‘हाऊसफुल ४’, ‘मिशन मंगल’ आणि आता ‘गुड न्यूज’ हे चार हिट चित्रपट दिले आणि हे वर्ष त्याच्यासाठी फारच लकी ठरले. चारही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरले आहेत.

अभिनेता अक्षयकुमार त्याच्या अभिनय आणि चित्रपटातील ॲक्‍शन सिन्समुळे नेहमीच चर्चेत असतो. एकाच वर्षात तो बॉक्‍स ऑफिसवर बॅक टू बॅक चित्रपट देत आला आहे.

२०१९ मध्ये त्याने एकापाठोपाठ एक ‘केसरी’, ‘हाऊसफुल ४’, ‘मिशन मंगल’ आणि आता ‘गुड न्यूज’ हे चार हिट चित्रपट दिले आणि हे वर्ष त्याच्यासाठी फारच लकी ठरले. चारही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरले आहेत.

‘गुड न्यूज’ हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात अजूनही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आठवडाभरातच १०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे २०२० मध्येही त्याच्या अशाच हिट चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News