अकोल्यातील सहा विद्यार्थी होणार न्यायाधीश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019
  • एमपीएससीचा निकाल जाहीर; १९० विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये अकोला जिल्ह्यातील सहा गुणवंतांनी बाजी मारली आहे.
एमपीएससीने नुकताच या परीक्षेचा प्रवर्गनिहाय निकाल जाहीर केला असून यामध्ये १९० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यश काणे, मेघा दजुका, जया चैनानी, अमिता यादव, आदित्य व्यास आणि वैशाली निर्गुडे आदींचा समावेश आहे. अकोल्यातील सर्व गुणवंतांचे वकील आणि न्यायधीशांनी अभिनंदन केले आहे.

वयाच्या २४ व्या वर्षीच झाला न्यायाधीश
यश काणे या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नातच यश प्राप्त केले. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षीच मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News