चिंचवड परिसरात अजित पवार यांच्या हस्ते कोविड-१९ रुग्णालयाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

 चिंचवड परिसरात अजित पवार यांच्या हस्ते कोविड-१९ रुग्णालयाचे उद्घाटन

चिंचवड परिसरात अजित पवार यांच्या हस्ते कोविड-१९ रुग्णालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं ऑटोक्लस्टर, चिंचवड परिसरातील कोविड-१९ रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी महानगरपालिकेनं स्वखर्चानं ह्या रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल अजित पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसंच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.

या संकट काळात मानवतेच्या दृष्टीनं सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीनं लढल्यास आपण नक्की जिंकू, असा मला विश्वास आहे. नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रुग्णांवर उपचारांती जादा देयक आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

शहरासह ग्रामीण भागात पथकं तयार करून देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. कोरोनाविरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीनं भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याच्या दृष्टीनं संशोधन सुरू  असल्याचे सुध्दा अजित पवारांनी सांगितले.

कोरोनाच्या संकट काळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसंच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगलं काम करीत आहेत. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोनाविरुध्दची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News