अजय देवगण साकारणार 'चाणक्‍य' चित्रपटात महत्त्वपूर्ण भुमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 April 2020
  • लॉकडाऊन संपल्यानंतर अजयचा एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना दिसणार आहे.

ऍक्‍शन, कॉमेडीरोमान्सक्राईम थ्रीलर पठडीतील अभिनेता अजय देवगणचे चित्रपट म्हणजे सिनेरसिकांसाठी फिल्मी मेजवानी असते. तान्हाजीसारख्या ऐतिहासिक चित्रपटामुळे तर तो प्रेक्षकांसाठी सुपरहिरो बनला.

आताही त्याच्या हाती बिग बजेट चित्रपटांची रांग आहे. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे "चाणक्‍य'. हा चित्रपट अजयसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. चाणक्‍यनितीचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटासाठी अजय सध्या धडपडत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर अजयचा एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना दिसणार आहे. अजय या चित्रपटासाठी पूर्ण टक्कल करणार आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यानेच याबाबत माहिती दिली. बॉलीवूडच्या या सिंघमचा बदलता अवतार पाहण्यासाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News