अजय देवगनचा धमाकेदार चित्रपट 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Saturday, 23 March 2019

२०१९ अजय देवगणसाठी फारच लकी ठरलं आहे. कारण येत्या वर्षात त्याचे बरेच बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘दे दे प्यार दे’. हा चित्रपट १७ मे रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

नुकतंच या चित्रपटाचं पहिलंवहिलं पोस्टर प्रदर्शित केलं. यात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग एका बाजूला; तर अभिनेत्री तब्बू दुसऱ्या बाजूला बसलेली दिसतेय. या दोघींमध्ये अजय फसलेला आहे. या पोस्टरवरील रकुल-तब्बूचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी ठरतोय. लव रंजन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अकीव अली याने केले. अजय, रकुल, तब्बूची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी दिसणार, याची उत्सुकता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News