ऐश्वर्या पुन्हा हॉलिवूडकडे

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Friday, 12 April 2019

प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोणबरोबरच विश्‍वसुंदरी ऐश्‍वर्या राय-बच्चननेही हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. ‘ब्राईड ॲण्ड प्रीज्युडीस’, ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस’, ‘प्रोवोक्‍ड’ यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये ती झळकली.

आता पुन्हा एकदा ती हॉलीवूड चित्रपटांकडे वळणार असल्याची चिन्हे दिसताहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्‍वर्याला हॉलीवूड चित्रपटांसाठी विचारणा होत आहे. शिवाय तिलाही हॉलीवूड चित्रपटात रस आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. २०१८ मध्ये ‘फन्ने खान’ चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं, पण तिच्या या चित्रपटाची जादू बॉक्‍स ऑफिसवर फिकी पडली. आता हॉलीवूड चित्रपटांमधून ती कामाला नव्याने सुरुवात करणार का हे पाहायचंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News