आयआयटी बॉम्बेच्या दोन विद्यार्थ्यांनी केली एआयआर स्कॅनरची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020
  • पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आयआयटी बॉम्बेच्या दोन विद्यार्थ्यांनी हातभार लावून विदेशी अँपना टक्कर देणारे भारतीय अँप बनवले आहे.
  • ह्या अँपचे नाव एआयआर स्कॅनर असून याची निर्मिती आयआयटी बॉम्बे येथे सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शिकणाऱ्या रोहित चौधरी आणि कवीन अग्रवाल यादोघांनी केली आहे.

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आयआयटी बॉम्बेच्या दोन विद्यार्थ्यांनी हातभार लावून विदेशी अँपना टक्कर देणारे भारतीय अँप बनवले आहे. ह्या अँपचे नाव एआयआर स्कॅनर असून याची निर्मिती आयआयटी बॉम्बे येथे सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात शिकणाऱ्या रोहित चौधरी आणि कवीन अग्रवाल यादोघांनी केली आहे. कोरोना काळात घरून काम करणारे कर्मचारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना ह्या अँप्लिकेशनचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास रोहित आणि कवीन या दोघांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ह्या अँपद्वारे स्कॅनिंग करणे, व्यवस्थापन करणे आणि ते इतरांसोबत शेअर करणे या प्राथमिक गरजांची पूर्तता केली जाणार आहे. सुरुवातीला एक रेडिंग अँप तयार करण्याचा प्रयत्न राहुल आणि कवीन करीत होते परंतु  त्यानंतर ह्या अँपमध्ये स्कॅनरचे फिचर टाकण्यात देखील  ते यशस्वी झाले. यापुढे देखील लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांवर काम करून या अँपमध्ये आणखी फीचर्स टाकण्याचे काम केले जाईल असे कवीन आणि रोहित यांकडून सांगण्यात आले.   
एआयआर स्कॅनर या नावताच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या आणि बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कागदपत्रांवरील मजकूर हा समजून घेताना तो ऐकताही येईल अशी सुविधा यात असणार आहे. तसेच स्कॅन केलेल्या मजकुरातील एखाद्या शब्दाचा अर्थ न उमगल्यास त्या शब्दावर क्लिक करून त्याचे भाषांतर तसेच समानार्थी शब्द देखील आपल्याला या अँपमधून समजणार आहेत. ह्या अँपमध्ये ऐकण्याची सुविधा ही सध्या केवळ इंग्रजी भाषेत असली तरी यामध्ये अधिक सुधारणा करून त्यात भारतातील विविध भाषांचा समावेश केला जाणार असल्याची माहिती, अँपची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे.  एआयआर स्कॅनर ह्या अँपचे अनावरण भारताच्या ७४व्या स्वतंत्र दिनाचे अवचित्य साधून १५ ऑगस्ट ह्या दिवशी प्ले स्टोरीवर करण्यात आले.  आमचे एआयआर स्कॅनर हे अँप आत्मनिर्भर भारताच्या अभियानात नक्कीच एक महत्वपूर्ण संशोधन ठरेल असे कवीन अग्रवाल याने म्हटले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News