लग्नाआधीच्या सेक्सने होणार एड्स, दहावीच्या पुस्तकातून शिकवण

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Wednesday, 6 March 2019

केरळच्या सरकारी शाळेतील दहावीच्या बायोलॉजी विषयाच्या पुस्तकातील एका धड्यामध्ये हा तर्क मांडण्यात आला आहे.

तिरुवनंतपुरम- लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स रोगाची लागण होते, असे ज्ञान सरकारी शाळेच्या पुस्तकात देण्यात आले आहे. केरळच्या सरकारी शाळेतील दहावीच्या बायोलॉजी विषयाच्या पुस्तकातील एका धड्यामध्ये हा तर्क मांडण्यात आला आहे.

संबंधित धड्यामध्ये एड्स होण्यामागील चार कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. कारणांमध्ये लग्नाआधी अथवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो, अशी माहिती छापण्यात आली आहे. बायोलॉजीचं हे पुस्तक शैक्षणिक वर्ष 2015-16मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थी या चुकीच्या माहितीचा अभ्यास करत आहेत. 

दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संशोधन अधिकारी निशी यांनी सांगितले की, पुस्तकात छापण्यात आलेली चूक आमच्या लक्षात आली असून ती तातडीने दुरूस्त करण्यात येईल. पुढील शैक्षणिक सत्रातील पुस्तकांमध्ये हा मुद्दा दिसणार नाही' असेही त्यांनी सांगितले आहे. 

एचआयव्ही विषाणूंची माहिती देणाऱ्या या धड्याचा फोटो पलक्कडमधील डॉक्टर अरूण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी शिक्षण विभागाला टार्गेट करण्यास सुरूवात केली. चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर शिक्षण विभागाने संबंधित चूक दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News