AICTE विशेष शिष्यवृती योजना; हे विद्यार्थी करु शकतात अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 September 2020

या योजनेद्वारे एम. ई, एम. टेक, एम. फार्म, एम. अर्च अभ्यासक्रसाठी उमेदवारांना दर महिना 12 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत, ही शिष्यवृत्ती दोन वर्ष कालावधीसाठी असणार आहे.

दिवसेंदिवस उच्च शिक्षण महाग होत चालले आहे, अशा परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे परवडत नाही. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्नीकल एज्युकेशन बोर्डाने विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेद्वारे एम. ई, एम. टेक, एम. फार्म, एम. अर्च अभ्यासक्रसाठी उमेदवारांना दर महिना 12 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत, ही शिष्यवृत्ती दोन वर्ष कालावधीसाठी असणार आहे. म्हणजेच पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे, त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थिक मदत होईल.

कोण करु शकतो शिष्यवृत्तीसाठी अर्ज

एम. ई, एम. टेक, एम. फार्म, एम. अर्च अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, ग्रॅज्युएट एप्टीट्यूट टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE) आणि ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूट टेस्ट (GPAT) परीक्षेतील गुणवत्ता धारक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शॉर्ट कोर्स करणारे विद्यार्थी, ओबीसी क्रिमीलीयर पास असणारे विद्यार्थी शिष्यवृतीसीठी अपात्र आहेत.

अर्ज कसा करावा 

उमेदवारांना aicte-india.org या ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्नीकल एज्युकेशन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून ऑनलाईन  शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा. अर्जासोबत दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून सर्व प्रमाणपत्र अपलोड करावीत. प्रमाणपत्रांवर राजपत्रित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन सत्यप्रत करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अपलोड केलेली सर्व प्रमाणपत्र हिंदी आणि इंग्रजी भाषेत असावीत. इतर भाषेतील प्रमाणपत्र ग्रह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:  31 डिसेंबर 2020 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News