एआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर

डॉ आर एस भांबर
Wednesday, 28 October 2020

अनुदानाच्या रकमेत विभागाकडून काही भर घालून, त्या पॉवरलॅब साधने खरेदी करणार आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संशोधन अधिक बळकट करण्याची योजना त्या आखत आहे. यामुळे पीजी आणि पीएचडी विद्यार्थ्यांमधील संशोधन कार्यास मदत होईल.

एआयसीटीईकडून प्रा डाॅ महालक्ष्मी मोहन यांना १५.२९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर

नाशिकः महात्मा गांधी विद्यामंदिरच्या फार्मसी काॅलेजच्या फार्माकाॅलाॅजी विभागाच्या प्रमुख प्रा. डाॅ महालक्ष्मी मोहन यांना आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)च्या माॅडर्नायझेशन अँड रिमुव्हल आॅप आॅबसोलेसन्स (एमओडीआरओबीएस) या योजनेंतर्गत रु १५.२९ लाखाचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

अनुदानाच्या रकमेत विभागाकडून काही भर घालून, त्या पॉवरलॅब साधने खरेदी करणार आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संशोधन अधिक बळकट करण्याची योजना त्या आखत आहे. यामुळे पीजी आणि पीएचडी विद्यार्थ्यांमधील संशोधन कार्यास मदत होईल.

प्रा डॉ महालक्ष्मी मोहन यांना २३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. नामांकित जर्नल्समध्ये त्यांचे जवळपास १०० संशोधने प्रकाशित झाली आहेत आणि त्यांनी त्यांच्या  पुस्तकाचेही लेखन केले आहे.

प्राचार्य डॉ आर एस भांबर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेला बी फार्म कार्यक्रमासाठी एनबीएने तीन वर्षांसाठी मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक म्हणून महाविद्यालयाला गेल्या चार वर्षात सुमारे एक कोटी रुपयांचा संशोधन निधी प्राप्त झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News