निकाल वेळेत लावण्याची जबाबदारी कुलगुरुंचीच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

वेळेवर निकाल लावण्याची जबाबदारी यापुढे कुलगुरुवर असेल असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी व्यक्त केले.

मुंबई: ज्या विद्यापीठाचे निकाल उशीरा लागतली त्या विद्यापीठांच्या कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. त्यामुळे वेळेवर निकाल लावण्याची जबाबदारी यापुढे कुलगुरुवर असेल असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी व्यक्त केले. रविवारी (ता.1) सावंत यांनी सीईटी सेलला भेट दिली आणि विविध विषयांवर प्रसार माध्यमाना माहिती दिली.

45 दिवसात परीक्षेचा निकाल लागणे बंधनकारक असताना विद्यापीठाचे निकाल वेळेत लागत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गंभीर नुकसान होतो. उशीरा निकाल लागल्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत संपलेली असते, अनेक विद्यार्थ्यांना नविन महाविद्यावयात प्रवेश मिळत नाही तर काही महाविद्यलयाच्या प्रवेश प्रक्रीया खोळंबतात. यामुळे वेळेत विद्यापीठाचे निकाल लागने गरजेचे आहे. 

'भारतीय शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले पाहीजे. विद्यार्थ्यांचे वेळेत निकाल लागावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक नियमावली बनवली आहे ती लवकरचं विद्यापीठांना दिली जाईल. विद्यापीठाने नियमावली काटेकोरपणे आंमलबजावणी करावी अन्यथा कुलगुरुंना जबाबदार धरले जाईन' असे सावंत म्हणाले.

विद्यापीठाचा निकल वेळेवर लागत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटना आंदोलन करतात. कालांतराने आंदोलनाला हिंसक वळन लागते, यात विद्यार्थी आणि विद्यापीठ दोघांचेही मोठे नुकसान होते. हे नुकसान टाकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मागण्या विद्यापीठाने तात्काळ सोडवल्या पाहीजे. विद्यापीठाचे कुलगुरु, अधिकरी, कर्मचारी यांना वेतन व भत्ते सरकार कडून दिले जातात त्यामुळे सरकराचा आदेश पाळण्याची जबाबदारी विद्यापीठांची असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News