अग्नीरथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

डब्यातील प्रवासी श्वास रोखून हे नाट्य पहात होते. कुणीतरी तिला बसायला जागा दिली. बरंच पळावं लागल्याने तिला जोराचा श्वास लागला होता. सर्वजण कौतुकाने तिला ' कमालकी औरत कमालकी औरत असं म्हणत होते कुणीतरी तिला पाणी प्यायला दिलं ते ती गटागटा प्यायली

हा प्रसंग सन एकोणीसशे एकसस्ट मधील आहे मी प्रथमच एकट्याने प्रवास करत होतो. वार्षिक परिक्षा संपल्यावर आजोळी कोट्याला निघालो होतो. त्या काळात रूळमार्गावर केवळ अग्नीरथच तैनात होते. पश्चिम रूळमार्गावरील'मुंबईमध्य' ह्या स्थानकावरून सुटणा-या सरहद्द टपाल गाडीचे आरक्षण बाबांनी करून ठेवले होते.आम्ही शुद्धीकरण केलेल्या भूगर्भीय तेलाचा इंधन म्हणून वापर करून चलत करण्याचे सयंत्र बसवलेल्या भाड्याच्या छकड्यात बसून 'मुंबईमध्य' ह्या स्थानकावर गेलो होतो . बाबा मला त्या गाडीत बसवून परत गेले होते. जाताना, ' स्थानकात गाडी थांबली असता गाडीतून शक्यतो बाहेर पडूं नको' अशी सुचना देऊन ते गेले होते.

गाडी सुटल्यावर मी बाबांना हात हलवून निरोप दिला व माझ्या आरक्षित जागेवर जाऊन बसलो. प्रथमश्रेणीच्या
त्या डब्यात चार शयनिका असलेले कक्ष असत .माझ्या समोर एक मध्यमवयीन काका बसले होते. एकटा प्रवास करत असताना कुणीतरी गप्पा मारण्यासाठी हवं असतं. मी त्या काकांशी गट्टी जमवली. मी स्वतःच्या हिमतीवर एकटा एवढ्या लांबचा प्रवास करत आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना खूप कौतुक वाटलं.त्यांच्याशी गप्पा मरताना रात्री झोपायची वेळ कधी आली ते कळलंच नाही.
सकाळी उठल्यावर मी दंतमंजन करून आलो तेवढ्यात गाडी एका मोठ्या स्थानकावर थांबली होती व ते काका, सकाळच्या नास्त्यासाठी केवळ खानपानाकरता असण-या डब्याकडे निघण्याच्या तयारीत होते.( त्या काळांत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठीची व्यवस्था नव्हती ) त्यांनी आग्रह केला म्हणून मीसुद्धा त्यांच्या सोबत गेलो. चालत्या गाडीतील त्या उपहारगृहात मेज व खुर्च्या मांडलेल्या होत्या. तिथे बसून पळती झाडे पहात नास्ता करण्याची मजा काही वेगळीच होती.

नास्ता संपल्यावर आमच्या डब्यात परत जाण्यासाठी ,स्थानकावर गाडी थांबण्याची वाट पहात बसलो होतो. एका लहानशा स्थानकावर गाडी थांबली आम्ही त्वरेने खाली उतरून आमच्या डब्याकडे निघालो नी अग्नीरथाची कर्कश्य शिट्टी वाजली अग्नीरथ संरक्षक हिरवा बावटा हलवत होता अग्नीरथ गमन आगमन भयसूचक स्वयंचलित विद्युत दीपिका हिरवी झाली होती. आम्हाला आमच्या डब्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते म्हणून आम्ही जवळच्या अनारक्षित डब्यात चढलो नी गाडी सुरू झाली. मी दारातच उभा होतो . मी पाहिलं की एक बुरखाधारी मध्यमवयीन महिला गाडी पकडण्यासाठी धावत येत आहे. तिच्या हातातले जड सामान मी घेतले व डब्यात ठेवले नंतर त्या महिलेचा हात पकडून मी तिला डब्यात खेचलं. हे अग्नीरथ आजच्या सारखे चटकन गतिमान होत नसत म्हणूनच हे शक्य झालं, नाहीतर त्या महिलेचं काही खरं नव्हतं.

डब्यातील प्रवासी श्वास रोखून हे नाट्य पहात होते. कुणीतरी तिला बसायला जागा दिली. बरंच पळावं लागल्याने तिला जोराचा श्वास लागला होता. सर्वजण कौतुकाने तिला ' कमालकी औरत कमालकी औरत असं म्हणत होते कुणीतरी तिला पाणी प्यायला दिलं ते ती गटागटा प्यायली नी स्थिरावली आणि म्हणाली ' मैं कमालकी औरत नहीं हूँ । कमाल तो मेरा देवर है । मैं जमालकी औरत हूँ ।

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News