नोकर भरतीची वयोमर्यादा वाढणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 April 2020

यंदा स्पर्धा परीक्षा रद्द झाल्यास परीक्षेला लागणारी वयोमर्यादा वाढवुन देण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी उमेदवारांना दिले.

मुंबई: कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. त्यामुळे सर्व स्पर्धा परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली. यंदा स्पर्धा परीक्षा रद्द झाल्यास परीक्षेला लागणारी वयोमर्यादा वाढवुन देण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी उमेदवारांना दिले.

काही उमेदवारांचा युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा शेवटचा अटेम्ट आहे. यंदा परीक्षा रद्द झाली तर त्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही त्यामुळे उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबच चर्चा करणार आहे. यंदाची परीक्षा रद्द झाली तर पुढच्या वर्षी परीक्षेची वयोमर्यादा वाढवण्याची विनंती करणार आहे. त्यामुळे वय वाढलेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार असे मत सावंत यांनी व्यक्त केले.  

युपीएससी आणि एमपीएसी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विशिष्ट वयाटी अट घालून देण्यात आली आहे. वयाची अट पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देण्याची परवाणगी असते, मात्र यंदा स्पर्धा परीक्षा होण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे काही उमदेवरांची यंदा शेवटची स्पर्धा परीक्षा होती, त्यानंतर वय वाढल्यामुळे त्यांना परीक्षा देता येणार नाही. अशा उमेदवारामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक उमेदवार अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, यंदा परीक्षा झाली नाही तर त्यांचे स्वप्न भंगणार आहे. उमेदवारांची वयोमर्यादा वाढल्यास लाखो तरुणांना याचा लाभ होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News