करिअरच्या नादात वाढतंय विवाहाचं वय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

अत्रे म्हणाले की पालकांच्या व मुलींच्या अपेक्षा वाढल्याने विवाहाचे वय वाढते त्यामुळे जास्त अपेक्षा न बघता तडजोड करून विवाह ठरवावा.

औरंगाबाद : ब्रह्मवृंद वैभव वधुवर सूचक केंद्रातर्फे नुकताच कलश मंगल कार्यालयात वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .या मेळाव्यात १६० उपवर वधूवरांनी नोंदणी केली. 

अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश केदारे गुरुजी, सुनील आत्रे, मिलिंद पिंपळे, शंतनू चौधरी, सुधाकर कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक दत्तात्रय पिंपळे यांनी केले. यावेळी  मार्गदर्शन करताना केदारे गुरुजी म्हणाले की मुलींनी उपवरातील गुण व कुटुंबातील संस्कार हे बघूनच विवाहाचा निर्णय घ्यावा. अत्रे म्हणाले की पालकांच्या व मुलींच्या अपेक्षा वाढल्याने विवाहाचे वय वाढते त्यामुळे जास्त अपेक्षा न बघता तडजोड करून विवाह ठरवावा. शंतनू चौधरी, सुधाकर कुलकर्णी, मिलिंद पिंपळे यांनीही मार्गदर्शन केले. सुधीर नाईक म्हणाले की मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार वधू पालकांनी योग्य वयातच कशी विवाह जुळतील या कडे बघावे. कार्यक्रमासाठी अश्विनी लोटांगणे, सुधीर देशपांडे, सुरेंद्र मंडलिक, देविदास जोशी, पद्माकर नाईक, रवी कुलकर्णी, श्रीप्रसाद कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. दत्तात्रय पिंपळे यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News