नामकरण विधीनंतर हत्तीच्या पिल्लाने केली धम्माल, व्हिडीओ झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

नामकरण विधीनंतर हत्तीच्या पिल्लाने केली धम्माल, व्हिडीओ झाला व्हायरल    

नामकरण विधीनंतर हत्तीच्या पिल्लाने केली धम्माल, व्हिडीओ झाला व्हायरल     

अनेकदा प्राण्यांचे चांगले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये छोट्या टबमध्ये हत्ती मस्ती करताना दिसतोय. हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. ट्विटमध्ये हत्तीच्या पिल्लाच्या नामकरण सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात आले आहे.

नुकताच हत्तीच्या पिल्लाचा नामकरण सोहळा दक्षिण कन्नड मंदिरातील धर्मशालामधील श्री मंजूनाथ स्वामी मंदिरात पार पडला. त्यानंतर पिल्लाने पाण्याच्या टबमध्ये खेळायला सुरूवात केली. असं एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटमध्ये म्हटलं आहे. या पिल्लाचा जन्म १ जुलैला झाला आहे. या पिल्लाला पण्यात खेळायला खूप आवडतं असं म्हटलं जातंय. व्हिडीओमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वापरण्यात येणार बाथटबमधील पाणी सोंडेने सगळीकडे उडवताना दिसतंय.

हा व्हिडीओ ३१ ऑगस्टला शेअर करण्यात आला आहे, त्यानंतर या व्हिडीओला ३०० हून अधिक लोकांनी शेअर केले आहे. दीड लाखापेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. अधिक लोकांशी शेअर करत, पिल्लू गोंडस असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सुध्दा कमेंट केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News