कोहली नंतर के. एल राहुल होणार कप्तान?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्ध 69 बॉलमध्ये 132 रन काढले. 14 चौके आणि 7 छक्के लगावत ही कामगीरी केली, आयपीएलमध्ये मधला हा सर्वोच्च स्कोर आहे,

यंदाच्या आयपीएलमध्ये के. एल राहुल यांनी धडाकेबाज कामगिरी केली. रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्ध 69 बॉलमध्ये 132 रन काढले. 14 चौके आणि 7 छक्के लगावत ही कामगीरी केली, आयपीएलमध्ये मधला हा सर्वोच्च स्कोर आहे, त्यामुळे भविष्यातील राहुल कडे कॅप्टनच्या दृष्टिकोनाने पाहिले जात आहे. 

24 सप्टेंबर रोजी किंग इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्या रंगतदार सामना झाला. राहुलने 84 रनवर एक जोरदार शॉट लगावला. तो बॉल विराटच्या हाती आला मात्र, विराटच्या हातून कॉच सुटली. त्यानंतर के. एल राहुल 90 रनवर असताना विराटने दुसरी कॉच सोडली. राहुलला दोन वेळा जीवनदान मिळाले. या संधीच सोन करत राहूलने तुफान बल्लेबाजी केली. आणि आपले शकत पुर्ण केले. 

विराट हा जगातील सर्वोत्तम फिल्डर मानला जातो मात्र, तरी देखील विराटच्या हातून कॉच सुचली. राहुलने याचा फायदा उठवत राजस्थान चॅलेंजरचा धुरळा उडवला. राहुलने केलेल्या कामगिरीवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. तर कोहलीच्या फिल्डींग आणि बॅटिंगवर प्रश्न उपस्थित केला. सोशल मीडियावर कोहलीला ट्रोल करण्यात आले,.

फलंदाजीसाठी उतरलेला कोहली लवकर परतला आणि फील्डिंगमध्ये चमकदार कामगीरी करु शकला नाही, त्यामुळे भविष्यात के एल राहुल हा भारताचा कॅप्टन होऊ शकतो अशा भावना सोशल मीडियावर प्रेक्षकांनी व्यक्त केल्या. खेळामध्ये अनेकदा यश अपयश येत असतात मात्र, एका सामन्यात खेळाडूला अवयश आले म्हणून त्यांच्या कामगीरीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. राहूलने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली तरी कॅप्टन होण्यासाठी आणखीन मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News