भारतानंतर आता अमेरिकाही घालणार टिकटॉकवर बंदी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020
  • चिनी सैन्याने दलवान खोऱ्यातील काही भागात घुसखोरी केल्यामुळे  भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले.  
  • भारताने चीनला प्रतिउत्तर म्हणून चिनी बनावटीच्या ५९ अँप वापरण्यावर बंदी आणली.
  • त्या ५९ अँपच्या यादींमध्ये टिकटॉक या लोकप्रिय आणि बहुचर्चिक विडिओ मेकिंग अँपचा देखील समावेश होता.

वॊशिंग्टन :- चिनी सैन्याने दलवान खोऱ्यातील काही भागात घुसखोरी केल्यामुळे  भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले. भारताने चीनला प्रतिउत्तर म्हणून चिनी बनावटीच्या ५९ अँप वापरण्यावर बंदी आणली. त्या ५९ अँपच्या यादींमध्ये टिकटॉक या लोकप्रिय आणि बहुचर्चिक विडिओ मेकिंग अँपचा देखील समावेश होता. भारताने चिनी अँपवरती बंदी आणल्यामुळे भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेतून चिनी कंपन्यांना बाहेर पडावं लागल. आता भारता पाठोपाठच अमेरिकेनेही टिकटॉक अँपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमधील तणाव पूर्ण संबंधांबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी टिकटॉक या चिनी अँपवर बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. परंतु अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनी ही टिकटॉक खरेदी करणार असल्यामुळे टिकटॉकवर बंदी आणण्याचा निर्णय अमेरिकन सरकार घेत नव्हतं. परंतु आता  मायक्रोसॉफ्ट कंपनी ही टिकटॉक खरेदी करणार नाही अशी शक्यता बळावताच ट्रम्प यांनी चिनी अँप बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे .

टिकटॉकला अमेरिकेत १५ सप्टेंबर पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली आहे. याआधी सिनेटने देखील अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना टिकटॉक अँप वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मंजुरी दिली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वी चॅट आणि टिकटॉक या दोन अँपवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर, अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट आणि बाईट डांस या कंपन्यांना टिकटॉकच्या अमेरिकेतील व्यवसायासंदर्भात १५ सप्टेंबर पूर्वी व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत. टिकटॉक सोबत अमेरिकेतील कंपन्यांचा व्यवहार पूर्ण झाला तर टिकटॉक हे चिनी अँप राहणार नाही. अमेरिकन कंपनीने टिकटॉक विकत घेतल्यानंतर कदाचित टिकटॉक पुन्हा भारतातही सुरु करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. परंतु १५ सप्टेंबर पूर्वी टिकटॉक सोबत व्यवहार करण्यास अमेरिकन कंपनी असमर्थ ठरल्या तर मात्र अमेरिकेतील टिकटॉक अँपच्या बंदीवर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News