पराभवानंतर लसिथ मलिंगाला अश्रू अनावर

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 11 January 2020
  • या सामन्यात भारतानी २०१ धावा केल्या होत्या. २०२ धावांचे लक्ष गाठण्यात लंकेला अपयश आल्याने सामना आणि मालिका दोन्ही गमावली.   
  • स्वतःच्या अनुभवाचा फायदा सामना जिकंण्यात ना आल्यामुळे लसिथ मलिंगाचा चांगलाच कंठ दाटून आला होता.

मुंबई : २०२० च्या नवीन वर्षाची सुरुवात टीम इंडियाने चांगलीच दणक्यात केली आहे.नवीन वर्षात सुद्धा टीम इंडियाची विजयी घोडदौड हि सुरूच असल्याचं दिसतंय.

श्रीलंकेच्या विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. भारत  आणि श्रीलंका यांच्यादरम्यान झालेल्या लढतीत तब्बल ७८ धावांनी  लंकेचा पराभव झाला त्यामुळे लसिथ मलिंगा यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले.

भारताने सामना आणि मालिका यादोघांवर एकहाती विजय मिळवल्याने लसिथ मलिंगा चांगलाच निराश झाला त्यामुळे त्याने अगदी भावनिकपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

ह्या मालिकेमध्ये लसीथला एकही गाडी बाद करण्यात यश आले नाही त्यामुळे तो चांगलाच हताश होता. स्वतःच्या अपयशामुळे लंकेचा पराभव झाल्याचे मत त्याने ह्यावेळेस व्यक्त केले.

या सामन्यात भारतानी २०१ धावा केल्या होत्या. २०२ धावांचे लक्ष गाठण्यात लंकेला अपयश आल्याने सामना आणि मालिका दोन्ही गमावली.   स्वतःच्या अनुभवाचा फायदा सामना जिकंण्यात ना आल्यामुळे लसिथ मलिंगाचा चांगलाच कंठ दाटून आला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News