आखिर दीपिका पदुकोण ही झाली ट्रोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

हटके ड्रेस घालून दीपिका पदुकोन ट्रोलर्सची लक्ष्य बनली आहे. दीपिकाने असा ड्रेस घातलाय की नेटकरी म्हणू लागलेत, काय गं बाई हे काय घातलंस?

बॉलिवूडमधल्या अभिनेत्री नेहमी काहीतरी वेगळी वेशभूषा परिधान करण्याच्या प्रयत्नात असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्चुम डिझायनरकडून हटके कपडे डिझाईन करत अभिनेत्री फोटोसेशन करतात. कोणताही पुरस्कार सोहळा असो किंवा एखादा कार्यक्रम असो बॉलिवूडमधल्या तारकांच्या वेशभूषेकडे सर्वांचे लक्ष असते.

पण बऱ्याचदा त्या या वेगळ्या वेशभूषेमुळे ट्रोल होताना दिसतात. अशाच प्रकारे हटके ड्रेस घालून दीपिका पदुकोन ट्रोलर्सची लक्ष्य बनली आहे. दीपिकाने असा ड्रेस घातलाय की नेटकरी म्हणू लागलेत, काय गं बाई हे काय घातलंस??

सध्या दीपिका तिच्या 'छपाक' या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती एका इव्हेंटला गेली असता तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ड्रेस इतका विचित्र होता की, सोशल मीडियावर तिला यामुळे लगेचच ट्रोल करण्यात आले.

काहींनी तर तिला 'लेडी रणवीस सिंग' अशी उपमा दिलीय. या प्रमोशन दरम्यान दीपिका पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली. तो प्रचंड ढगळा होता. त्या खाली निळ्या रंगाची लूज जीन्स तिने घातली आहे. पण सगळ्यात विचित्र म्हणजे या शर्टवर दीपिकाने काळ्या रंगाचा कोरसेट घातला आहे.

शर्टवर कोरसेट घातल्याने ते थोडं विचित्र दिसतंय आणि याचमुळे ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतीय. ती नेहमी डिझायनर सब्यसाचीचे कपडे घालते, त्यात ती सुंदर दिसते पण आता हा प्रकार केल्याने तिची खिल्ली उडवली जात आहे.

दीपिकाचा नवरा रणवीर हाही त्याच्या विचित्र कपड्यामुंळे ट्रोल होत असतो. पण आता दीपिकाही असे ड्रेस घालू लागल्याने हे 'शादी के साईड इफेक्ट्स' तर नाहीत ना, असा सवाल नेटकरी करू लागले आहेत. तर एका युजरने तिची तुलना चक्क सुपरमॅनशी केली आहे.

जो पँटवरून अँडरवेअर घालतो. तर काही जण म्हणतायत हे असे कपडे दीपिकाच घालू शकते. 

अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित छपाक हा चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होईल. त्यात दीपिका मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती बिझी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News