१७ दिवस अभ्यास करून अक्षत कौशल बनला आयपीएस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

नवी दिल्ली - 'युपीएससी परीक्षा देणारे अनेक तरूण अखेरीला माघार घेताना दिसतात, मात्र अक्षत कौशलने तर ५ वेळा नापास होऊनही युपीएससी सारख्या अव्वल परीक्षेत ५५ वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अक्षतने ५ वेळा परीक्षा दिली, पण त्याला यश गवसलं नाही. परीक्षा अवघ्या १७ दिवसांवर असताना त्याने अभ्यान करून ५१ वा रॅंक मिळविल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. 

नवी दिल्ली - 'युपीएससी परीक्षा देणारे अनेक तरूण अखेरीला माघार घेताना दिसतात, मात्र अक्षत कौशलने तर ५ वेळा नापास होऊनही युपीएससी सारख्या अव्वल परीक्षेत ५५ वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अक्षतने ५ वेळा परीक्षा दिली, पण त्याला यश गवसलं नाही. परीक्षा अवघ्या १७ दिवसांवर असताना त्याने अभ्यान करून ५१ वा रॅंक मिळविल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. 

जेव्हा अक्षत युपीएससीसाठी सुरूवातीला प्रयत्न करत होता, त्यावेळी त्याने सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत अभ्यास केला होता. त्यावेळी पहिल्यांदाच परिक्षा देतोय म्हणून त्याने काहीही वेळ वाया न घालवता पुस्तकात डोके घालून अभ्यास केला. परंतु इतका अभ्यास करूनही तो पूर्व परीक्षेत नापास झाला

पहिला प्रयत्न...

दुस-यांच्या चुकांमधून धडा घेणा-या अक्षतने पहिल्यांदा परीक्षेचा आवाका समजून घेतला. परीक्षेची तयारी करत असताना त्याने कसलीही कमतरता जाणवू दिली नाही. दुस-यांनी केलेल्या चुका तुमच्याकडून होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली. 

दुसरा प्रयत्न...

कोणत्याही विषयाला सहज घेतले नाही, हा विषय सोप्पा आहे, म्हणून त्याचे वाचन केले नाही असं कधीचं घडलं नाही. सगळ्या विषयांना समान संधी देऊन त्यावरती विचार करत राहिलो. यामुळे त्याचा अभ्यास पक्का झाला. 

तिसरा प्रयत्न... 

सुरूवातीच्या परीक्षा नापास झाल्यानंतर हा नाद सोडून पुन्हा नोकरी करावी असं मनात आलं, काही जीवलग मित्रांनी मला त्यावेळी समजून सांगितलं आणि पुन्हा त्या मार्गाकडे वळवलं. तयारी करत असताना तुम्हाला योग्य साथीदाराची गरज आहे. ते तुम्हाला नक्की चांगला सल्ला देतील आणि चुका सुधारण्यास सुध्दा मदत करतील 

चौथा प्रयत्न...

अक्षतला लिहायला खूप आवडतं, त्यामुळे तो एका वृत्तपत्रासाठी लिहीत सुध्दा होता, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. जेव्हा चौथ्या परीक्षेचा निकाल हाती आला तेव्हा समजलं की अनुभवी लोकांशी अधिक संवाद साधायला हवा. 

पाचवा प्रयत्न... 

परीक्षा केवळ १७ दिवसांवर आली होती. तेव्हा परीक्षेच्या तयारीला अक्षतने सुरूवात केली. आताच्या परीक्षेला ब-याच अनुभवानंतर सामोरे जाणार होतो. कारण बरेच विषय स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्याला यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. मुलाखतीदरम्यान आत्मविश्वास कामी आला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News