तब्ब्ल चाळीस वर्षांनी निघणार 'या' सुपरहिट चित्रपटाचा रिमेक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 March 2020
  • प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याने हा चित्रपट हिट ठरला होता.  आता याच चित्रपटाचा रिमेक बनविण्यात येणार आहे.

बॉलिवूडमध्ये ८० आणि ९० च्या दशकात अनेक चित्रपट हिट ठरले. यामधील १९८० मध्ये हिट ठरलेला 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होते. आता तब्ब्ल चाळीस वर्षांनी या चित्रपटाचा रिमेक काढण्यात येणार आहे. जॅकी भगनानी आणि जुनो चोपडा यांनी काढलेल्या 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटाचा रिमेक काढण्याची घोषणा केली आहे. 

या चित्रपटात विनोद खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, डॅनी, विनोद मेहरा, हेमा मालिनी, परवीन बाबी आणि नीतू सिंह यांसारखे कलाकार होते. प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याने हा चित्रपट हिट ठरला होता.  आता याच चित्रपटाचा रिमेक बनविण्यात येणार आहे.  

या चित्रपटात कोणते कलाकार असणार याबाबत कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. मात्र सध्या बॉलिवूडमध्ये असलेल्या नव्या कलाकारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. या कलाकारांची निवड झाल्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News