अफेर श्रीमंत मुलीशीच करावे? यिनबझचा खुलासा...

सुरज पाटील (यिनबझ)
Thursday, 11 April 2019

काही तरुणांमध्ये एक क्रेझ बनली आहे, की गर्लफ्रेंड असावी तर ती मोठ्या खांदानातली, किंवा टायटलप्रमाणे, अफेअर करावे; तर श्रीमंत मुलीशीच. असा विचार करणाऱ्या तरुणांसाठी हा खास सल्ला यिनबझच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

देशात आणि जगात प्रेम, लिव्ह इन रिलेशन शिप, मैत्री, दोस्ती, प्यार, मोहब्बत, इजहार अशा अनेक शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत. प्रत्येकजण त्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहत असतो. त्यातंच कोणी जीव लावून प्रेम करत असतो, तर कोणी टाईमपास म्हणून आपल्या प्रेमाकडे पाहात असतो. अशाच या प्रेमाच्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या तरुणांसाठी एक गंमत घेऊन आलोय.

काही तरुणांमध्ये एक क्रेझ बनली आहे, की गर्लफ्रेंड असावी तर ती मोठ्या खांदानातली, किंवा टायटलप्रमाणे अफेअर करावे, तर श्रीमंत मुलीशी. असा विचार करणाऱ्या तरुणांसाठी हा खास सल्ला यिनबझच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

प्रेम या गोष्टीला शुल्लक समजणारे किंवा त्यावर वेगवेगळे कमेंट करणारे तरुण आणि तरुणी, हे आयुष्यात कधीच भावना, दातृत्व, माया या गोष्टींशी सलग्न नसतात, समोरच्या व्यक्तीची काळजी किंवा त्यावरचा विश्वास या गोष्टींना घेऊन ते लोक कधीच सिरीअस नसतात, हे सगळे एकीकडे असताना आजकालच्या तरुण आणि चक्क तरुणींनादेखील हे वाटते की, आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडचे वडिल किंवा पालक हे मोठ्या घराण्यातले असावेत, जेनेकरून कोणतीही आर्थिक चणचण त्यांच्या रिलेशनमध्ये येऊ नये.

यावरचा यिनबझचा खुलासा...
प्रेम हे कोणत्याही टाईमपाससाठी नसते. आयुष्यात मिळालेला जोडीदार हा आयुष्यभरासाठी मानसिकरित्या बांधलेला असतो. मी किती श्रेष्ठ आहे, मीच या रिलेशनमध्ये समजून घेतो अशा अनेक बिनबूडाच्या गोष्टी ज्यावेळी प्रेमाच्या नात्यात येतात, त्यावेळी भांडण, तंटा, राग, अविश्वास अशा अनेक गोष्टी निर्माण होत असतात. त्यामुळे प्रेम करणाऱ्यांना एकच सल्ला असा की, आयुष्यात समोरच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला, विश्वास ठेवा, समजून घ्या, त्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी रहा... 

विचारांची देवाणघेवाण त्या व्यक्तीसोबत करत चला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गैरसमज करण्या आधी स्व:हेतूने त्या व्यक्तीशी बोला... आयुष्य खूप सुंदर राहिल.

प्रेम करण्यासाठी श्रींमती कधीच मॅटर नाही करत. त्याच्या किंवा तिच्या वडिलांची कितीही गडगंज संपत्ती असली म्हणजे ती संपत्ती कधीच नात्यात एकोपा आणू शकत नाही, नात्यात एकोपा आणतो तो म्हणजे जिव्हाळा आणि तोच सांभाळण्याचा प्रयत्न आयुष्यभर करा... रिलेशन नक्कीच टिकेल.

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News