एअरस्ट्राइकचा घटनाक्रम

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

14 फेब्रुवारी 
- रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास श्रीनगर रस्त्यावरील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या वाहनाला धडकवून भीषण स्फोट केला. या हल्ल्यात भारताचे 42 जवान हुतात्मा.
- हल्याची जबाबदारी जैश -ए - महोम्मद संघटनेने स्विकारली.

14 फेब्रुवारी 
- रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास श्रीनगर रस्त्यावरील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या वाहनाला धडकवून भीषण स्फोट केला. या हल्ल्यात भारताचे 42 जवान हुतात्मा.
- हल्याची जबाबदारी जैश -ए - महोम्मद संघटनेने स्विकारली.

15 फेब्रुवारी 
- पंतप्रधान मोंदीनी सेन्याला कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे आणि या हल्लाला प्रत्युतर देण्याचे आश्वासन भारतीय जनतेला दिले.
- तसेच विशेष बैठकीत तिन्ही सन्यदल प्रमुखांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी अशा प्रकारे दहशतवादी ठिकाणे नष्ट करण्यासाठी पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली.
- यावेळी पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी न होता. फक्त दहशतवादी ठिकाणांनाच उध्वस्त करण्याचे निश्चित झाले. 

16 फेब्रुवारी 
- यानंतर पाकिस्तानचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर तयारी सुरु झाली. सिमारेषेवर मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरु असतानाच नौदलालचा कराचीच्या जवळ तैनात करण्यात आले. 
- भारतीय वायुसेनेला एअरस्ट्राइक पार पाडण्याचे काम देण्यात आले. आयएएफच्या डीजी एअर ओप्सने या कारवाईच्या तयारीसाठी 10 दिवसांची मागणी केली. 

-- मुझफ्फराबादमधून त्यांच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करण्याचे हवाई दलाने निश्चित केले. कारण मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाची मारक क्षमता कमी आहे. आपले नुकसान होऊ नये, यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी हवाई दलास स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये फार आतपर्यंत न जाण्याचे आदेश देण्यात आले होते.
- त्याचदिवशी पाकिस्तानच्या रडारची क्षमता आणि त्याच्या डेव्हलपमेंटची माहिती मिळविण्यासाठी विशेष ड्रॉनची निर्मिती करण्यात आली. 
- पोखरणमध्ये आयएएफचे वायुशक्ती प्रयोग पाकिस्तानच्या रडार क्षमतेची तपासणी करण्यासाठी त्वरित सुधारित करण्यात आली. पाक रडार ज्यावेळी अत्यंत संवेदनशील असते, त्यावेळी विशेषत: एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमा जवळील आयएएफ बेसवर पाकिस्तानचे लक्ष केंद्रित केलेले असते. म्हणून, हवाई हल्ले सुरू करण्यासाठी ग्वाल्हेरची निवड करण्यात आली. 
- त्यानुसार, आयएल - 78 एअर रेफ्युएलिंग टँगर आग्रा येथून आणण्यात आला, एवाय- 145 एअरबॉर्न रडार भटिंडा एअरबेसकडून आणण्यात आले आणि मिराज 2000 कारवाई करत असताना एसयू -30 तत्काळ बचावासाठी सिरसा एअरबेसकडून आणले गेले.

18 फेब्रुवारी
- आयएस चीफ आणि रॉचे प्रमुख आणि एनएसएच्या लष्करी सल्लागाराने आयएएफला 5 ठिकाणांची माहिती दिली जेथे कारवाई होऊ शकते. त्यापेकी तीन ठिकाणांची निवड करण्यात आली. 

19 फेब्रुवारी
 - आयएएफने एअरस्ट्राईकचा संपूर्ण प्लान तयार करुन त्यावर पंतप्रधान आणि एनएसए बरोबर याची चर्चा केली. त्यांच्या संमतीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने आपले नुकसान होऊ नये, पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये फार आतपर्यंत न जाण्याचे आदेश देण्यात आले.

26 फेब्रुवारी
-निवड करण्यात आलेली ठिकाणे - बालाकोट, मुजफ्फरबाद आणि चकोठी येथे जैश -ए- मोहम्मद, एलटीटी आणि एचएमचे संयुक्त प्रशिक्षण शिबिरे आहेत.
- पहाटे 3 ते 3.30 दरम्यान भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून एअर स्ट्राईक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News