तेलंगणा मुख्यमंत्र्यांना 'या'ने दिला होता सल्ला...त्याप्रमाणेच झाला आरोपींचा एन्काउंटर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 December 2019
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया दिली होती,  यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे.

मुंबई : तेलंगणातील हैद्राबादमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. पोलीस आणि आरोपींमध्ये झालेल्या चकमकीत आरोपींचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच हा एन्काऊंटर करण्यात आल्याचे सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया दिली होती,  यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे. त्याने म्हटले होते की, आरोपीना घटनास्थळी नेवून तिथे काय झाले ते विचारा.. ते पळून जाण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडा. हे संबंधित अकाउंट सध्या दिलीत करण्यात आले आहे. मात्र हा स्क्रीनशॉर्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले की, 'आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितलं तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.' 

दरम्यान नागरिक म्हणून पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थन एका बाजुला होत असताना कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायला हवी होती असं म्हणत प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News