पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, विधानसभेसाठी अर्जुनाच्या ‘लक्ष्या’प्रमाणे काम करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • शरद पवार यांचे आवाहन; राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मुंबईत बैठक
  • जो पॅटर्न बारामतीत होता तोच पॅटर्न शिरूरमध्ये लावला

मुंबई : अर्जुनाचे संपूर्ण लक्ष्य त्या पोपटाच्या डोळ्यावर होते, त्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत काही झाले तरी पक्षाला यश देणारच अशा प्रकारे सर्वांनी काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. या वेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे संघटनेत एक अस्वस्थता होती. त्यामुळे हा मेळावा बोलावला आहे. देशात हा निकाल लागेल असे अपेक्षित नव्हते; मात्र पराभव मिळाला म्हणून खचून जायचे नसते. जय मिळाला म्हणून हवेत राहायचे नसते. जय-पराजय हा भाग असतोच. निकाल आपल्या बाजूला लागला नाही म्हणून नाउमेद होऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

एक काळ होता तेव्हा आम्हाला ५४ लोक सोडून गेले होते. फक्त सहा लोक उरले होते, पण आम्ही जोमाने काम केले, ६० लोक निवडून आणले आणि सोडून गेलेल्या ५१ लोकांचा कार्यक्रम केला. आता आपल्याला पुन्हा त्याच जिद्दीने लढायचे आहे. काँग्रेस आघाडी करण्यावर ठाम आहे. आणखी समविचारी लोकांना एकत्र घेऊ आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ, असा जबरदस्त आत्मविश्‍वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.

लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देऊ शकतो असा लोकांना प्रश्‍न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

लोकांशी थेट संवाद साधा ; सुप्रिया सुळे
जो पॅटर्न बारामतीत होता तोच पॅटर्न शिरूरमध्ये लावला. लोकांशी थेट संवाद साधला म्हणून हे शक्‍य झाले. विधानसभेतही लोकांशी थेट संवाद साधा, असे आवाहन 

 

 

   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News