धाडसी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020

धाडसी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात

धाडसी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात

सांगली - सातारा जिल्ह्यातील महाबळेश्र्वर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे, तिथं नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान अनेक पर्यटक येतात. देशभरातून अनेक पर्यटक थंडीचा अनुभव घेण्यासाठी येतात. परंतु त्याचं पध्दतीचं पर्यटनाच्या दुष्टीने भटकंतीसाठी अनेकजण महाबळेश्र्वर समजून सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा तालुक्यातील गुडे-पाचगणीला भेट देतात. ऋतूनुसार तिथंल चित्र बदलतं असतं, तेचं पर्यटकांना आवडतं. या परिसरात तरूण अधिक फिरताना दिसतात कारण पावसाळ्यात हे ठिकाण तुम्हाला महाबळेश्वर असल्यासारखं वाटतं.

पावसाळ्यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक या स्थळला अधिक भेट देतात. कारण हे ठिकाण तिन्ही जिल्ह्याच्या सीमारेषेवरती आहे. तिथं काही वर्षापुर्वी पवनउर्जा तिथं बसवण्यात आली. पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. हे यंत्र बसविल्यानंतर तिथं पर्यटकांचा लोढा वाढला तो अद्याप थांबलेला नाही. तिथं फक्त फिरण्यासाठी जाणा-यांची संख्या अधिक त्यामुळे त्या परिसरात अजून इतर सेवा नाहीत. पवनचक्की लावल्यापासून तिथं पाऊस हा चारही महिने असतो. तसेच पाऊस जरी नसलातरी धुकं हे कायम असतं असं तिथले स्थानिक सांगतात.

सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातील पर्यटकांना ३२ शिराळा तालुक्यातल्या आरळा, करूंगली या ठिकाणाहूत तिथं जाण्यास रस्ता आहे. तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मेणी या गावातून तिथं जाण्यास रस्ता आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील पर्यटक तिथं पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे तिथं पावसाळ्यात प्रचंड धुकं पाहायला मिळतं. त्याचबरोबर हे ठिकाण उंचावरती असून तिथून तिन्ही जिल्ह्याचं दर्शन होतं. तसेच डोंगररागांचं सुध्द दर्शन पाहावयास मिळतं.चांदोली धरण तिथून काही अंतरावरती असल्याने त्याचंही लांबून दर्शन होतं. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणी अनेकजण महाबळेश्र्वर असं संबोधतात.

तिथली डोंगराळ भागातील जागा ही पवनचक्कीसाठी विकत घेतल्याने तिथं कोणत्याही उद्योग उभा करण्यात लोकांना अनेक अडचणी येतात. कारण शेवटी जाग्याचा प्रश्न उभा राहतो. तिथं शिराळा, शाहुवाडी आणि कराड तालुक्यातील अनेक शाळा मुलांच्या ज्ञानासाठी भेट देत असते. ज्यांना हे ठिकाण माहित आहे अशी परिसरात कामानिमित्त आल्यानंतर तिथं भेट देतात. हिवाळ्यात सुध्दा थंडी मोठ्या प्रमाणात जाणवते. हिवाळ्यात तिथं तुम्हाला डोंगरमाथ्यावरून एक वेगळ दृष्य पाहायला मिळतं. तसेच तिथली हवा आरोग्यासाठी उत्तम असल्याचं अनेक पर्यटकांचं म्हणणं आहेत. हिवाळ्यात सुकलेलं गवत आणि बाजूला असलेलं जंगलं असा भाग तुम्हाला पाहायला मिळतो.

तिथून काही अंतरावरती म्हणजे साधारण १० किलोमीटरवरती चांदोली धरण परिसर आहे. त्यांच्याबाजूला आंतरराष्ट्रीय चांदोली अभ्ययारण्य आहे. त्यामुळे तिथं काही पर्यटक दोन्ही ठिकाणांना भेट देण्यासाठी सकाळी लवकर पोहचतात. कारण गुडे-पाचगणी परिसर फिरल्यानंतर तुम्हाला १० किलोमीटरवरती असलेल्या चांदोली धरण परिसरात जेवण किंवा राहण्याची सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटक तिकडे जातात.

३२ टीमसीचं असलेलं चांदोली धरण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांधण्यात आलं या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे धरणातील पाणीसाठी कधीही संपत नाही. तसेच या धरणातील पाणी कर्नाटकपर्यंत वारणानदीच्या मार्फेत पोहचवलं जातं. धरण परिसरात दोन पोलिस स्टेशन कडून सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. ३२ शिराळा तालुक्यातील कोकरूड पोलिस स्टेशन आणि दुसरं म्हणजे शाहुवाडी पोलिस स्टेशन कारण हे धरण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सिमेवरती आहे. पांटबंधारे विभाग धरणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करीत आहे.

शाहुवाडी आणि ३२ शिराळा तालुक्यातील अधिक तरूणवर्ग धरण परिसरात पार्ट्या करताना दिसतो. कारण कॉलेजवयीन मुलांना ते ठिकाण खुप आवडतं. तिथं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने जेवानाचं साहित्य घेऊन जातात आणि इन्जॉय करतात. पण ज्यांना धरण परिसरात फिरायचं आहे किंवा चांदोली अभयारण्य परिसरात फिरायचं अशा नागरिकांसाठी फॉरेस्ट विभागाचा परवाना मिळवावा लागतो. तो असल्याशिवाय परिसरात जाण्यास मनाई आहे.

हिवाळ्यात अनेक पर्यटक, चांदोली अभयारण्य भिरण्यासाठी जातात, त्यांच्याकडे रितसर परवाना असतो. कारण परवाना घेतल्यानंतर तुम्हाला २० किलोमीटरपर्यंत फिरता येतं. धरण भागाच्या आजूबाजूला राष्ट्रीय अभयारण्य असल्यामुळे तिथं प्राणी मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात. अनेक गवा पर्यटकांना त्रास देत असल्याचे तिथल्या अधिका-यांनी सांगितले. जंगलात आतमध्ये ३२ किलोमीटर दरम्यान प्रचितगड आहे. तिथं जाण्यास जंगलातून तीन दिवस लागतात असं अधिका-यांचं म्हणणं आहे, कारण जाताना अनेक अडचणी येतात. तिथं भागातले धाडसी तरूण जातात. सर्वत्र जंगल आणि प्राणी पाहायवयास मिळतात. ज्या पर्यटकाला रस्त्याची माहिती आहे असाच पर्यटक तिथं जाण्याचं धाडस करतो.

प्रत्येकवर्षी जंगलात फिरायला जाणारे काही ग्रुप आहेत. ते त्यांच्या ठरलेल्या कालावधीमध्ये परवाना काढतात आणि फिरायला जातात. प्रचितगड ही ऐतिहासिक वास्तू आतमध्ये असल्याने गडप्रेमी आणि अभ्यासूमंडळीही तिथं प्रत्येकवर्षी जाते. तिथं गेल्यानंतर वेगळा निसर्ग पाहायला मिळतो. कारण तो गड चढण्यास खूप अवघड आहे. सगळ डोंगरावरती गड असल्याने ज्यांचं धाडसं आहे अशीचं व्यक्ती तिथं जाते. गड परिसरात अजून गरम पाणी आढळून येत. हे शिवाजी महाराजांच्या काळापासून तसंच आहे असंही तेथील अधिका-यांनी सांगितलं.

चांदोली परिसरात राहायची गैरसोय होऊ नये म्हणून तिथं आता रेस्टोरंट बांधण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातून तिथं पर्यटक येतात. काही पर्यटक अभ्यासाठी तर काही फिरण्यासाठी येत असतात. जाधववाडी परिसरात हे रेस्टोरंट बांधण्यात आलं आहे. तिथून तुम्हाला धरणाचा संपुर्ण भाग दिसतो. तसेच आतमध्ये असलेल्या जंगलाचा अंदाज सुध्दा येतो. तिथून जाधववाडी जवळ आहे. तिथून जंगलात जायला रस्ता आहे. तिथल्या गेटवरती तुम्हाला फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी भेटतात. साधारण २० किलोमीटरवरती आतमध्ये धनगरवाडा असल्याचे अधिकारी सांगतात. सकाळी एक एसटी आणि रात्री एक एसटी अशी तिथली प्रवासाठी सुविधा करण्यात आली आहे.

धनगरवाडा परिसरात गेल्यानंतर तुम्हाला रानमेवा ऋतूनुसार खायला मिळतो. कारण वास्तव करत असलेल्या लोकांनी तिथल्या झाडांची मोठ्या प्रमाणात जपणूक केली आहे. तिथं दिवसाढवळ्या प्राणी समोर उभा राहतो. तिथं वास्तव करणारी मंडळी ही आपल्याकडं साहित्य असल्याशिवाय घराबाहेर पडतं नाही. कारण शेळी आणि जनावरं अनेकदा त्यांच्या डोळ्यांसमोरून वाघांनी नेली आहेत. त्या परिसरात बिबट्याचा अधिक वावर असतो. तसेच रात्र झाल्यानंतर घराभोवती शेळी आणि कुत्र्यासाठी बिबट्या फिरत असतो असं प्रणव महाजन या तरूणाने सांगितले.

प्रणव महाजन हा वन्यजीव यांच्यासाठी काम करतो तो सांगत होता की, बिबट्या नावाचा प्राणी हा शक्यतो मानवावरती हल्ला करत नाही. त्याचं खाद्य आहे प्राणी त्यामुळे तो प्राण्याच्या शिकारीसाठी घरांच्या बाजूला फिरत असतो. तसंच एकदा बिबट्या त्या परिसरात आला आणि राहू लागला, तर तो ती जागा सोडत नाही, त्याला सोबत घेऊनच आपल्याला जगावं लागतं. त्याची पिल्ली जर त्या परिसरात असतील १०० किलोमीटरवरती सोडला तरी तो तिथं येणारचं हे ठरलेलं आहे.बिबट्या हा प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी मानवावरती हल्ला करतो.

माझं जावेद डांगे मी चांदोली धरण परिसरातपासून १० किलोमीटरवरती राहतो. ५ वर्षापुर्वी आम्ही प्रचितगड आणि झोळंबी या ठिकाणी भेट देण्यासाठी ग्रुपने गेलो होतो. आमच्याकडे परवाना नव्हता. आमच्या ग्रुपमध्ये रस्ता माहित असलेली तरूण मंडळी होती. त्यामुळे आम्ही स्वत: च्या बचावासाठी काही ठरावीक हत्यारं घेऊन २० जण गेलो. होतो. जाताना १० किलोमीटर होईपर्यंत आम्हाला काहीचं वाटलं नाही. परंतु जसं आतमध्ये जाईल तसं सगळीकडं जंगलं दिसतं होतं. जंगलात पक्षाचा किलकिलाट आवाज येत होता. जाताना पहिला टॉवर म्हणजे झोपायची किंवा राहायची जागा आहे तिथं रात्र पडायच्या आतमध्ये पोहोचायचं होतं त्यामुळे गडबडघाई करीत होतो. कुठेकुठे जंगलात सुर्य दिसत नव्हता इतकं घनदाड जंगलं दिसतं होतं. काहीजण सोबत नवीन असल्याने आवाजने भयभीत होतं होते. सायंकाळी ५ च्या सुमारास आम्ही पहिल्या टॉवरवरती पोहोचलो. रात्री प्राण्यांचे आवाज आम्ही ऐकतं होतो. सकाळ झाल्यानंतर पुन्हा आम्ही वाट पकडली. अखेरीस दुस-या दिवशी सायंकाळपर्यंत आम्ही प्रचितगड गाठला. कारण तिथं जाणं आणि ते पाहणं आमचं अनेकांचं स्वप्न होतं. ज्यावेळी खालून प्रचितगड पाहिला तेव्हा पोहचेण की नाही असं वाटलं होतं. पण सगळ्यांच्या मदतीनं आम्ही तिथंपर्यंत पोहोचलो. तिथलं नैसर्गिक सौदर्य पाहिलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News