साहसी पर्यटन होणार अधिक सुरक्षित 

शिवाजी यादव, सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 June 2019

कोल्हापूर - राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन केंद्रावर विशेषतः सागरी किनारपट्टी, गडकोट किल्ले, पश्‍चिम घाट किंवा विदर्भातील जंगल सफारी अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. याच गर्दीचा लाभ उठविण्यासाठी साहसी पर्यटन हा प्रकारही तेजीत सुरू आहे. यातून घडणारे अपघात विचारात घेऊन जिल्हास्तरावर साहसी पर्यटन सुरक्षा समिती स्थापन केली आहे.

कोल्हापूर - राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन केंद्रावर विशेषतः सागरी किनारपट्टी, गडकोट किल्ले, पश्‍चिम घाट किंवा विदर्भातील जंगल सफारी अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. याच गर्दीचा लाभ उठविण्यासाठी साहसी पर्यटन हा प्रकारही तेजीत सुरू आहे. यातून घडणारे अपघात विचारात घेऊन जिल्हास्तरावर साहसी पर्यटन सुरक्षा समिती स्थापन केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीद्वारे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याबाबत उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. उन्हाळी वा दिवाळी सुटीच्या कालावधीत पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. याशिवाय काही हौशी पर्यटक बारमाही वेगवेगळ्या ऋुतूमध्ये पर्यटनाचा आनंद घेतात. यात काहीजण जंगलात, गडकोट किल्ल्यांवर पदभ्रमंती करतात, तर काही समुद्र किनाऱ्यांवर असलेल्या विविध क्रीडा प्रकाराचा आनंद घेतात.

वर्षा पर्यटनाचा भाग म्हणून धबधबे पहाण्याचा आनंद घेतात. अशा पर्यटन स्थळावर साहसी पर्यटन हा प्रकार क्रीडा व्यवसायाच्या अंगाणे विकसित झाला आहे. यात पॅराग्लायडिंग, रोप क्‍लायंबीग, हिलरायडींगपासून ते नौका नयन, स्कूबा ड्रायव्हींगपर्यंतचे साहसी क्रीडा प्रकार सध्या तेजीत आहेत. 

अनेकदा गर्दी होते तेव्हा जास्त व्यवसाय कमविण्याच्या नादात अपुऱ्या सुरक्षितेतही असे खेळ खेळले जातात तेव्हा एखादा अपघात होऊन कोणाचा जीव जाण्याची शक्‍यता वाढते. ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

या समितीत पोलिस, जिल्हा क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे अधिकारी, महसुल विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीतर्फे जिल्ह्यातील साहसी क्रीडा प्रकारांना मान्यता देताना नियम अटी घालून देण्यात येईल तसेच सुरक्षितेतच्या उपाययोजना काय आहेत याची माहिती घेऊन ही समिती मान्यता देण्यात येणार आहे. याशिवाय वर्षभर होणाऱ्या पर्यटनाची खबरदारी घेणे तसेच अपत्तीकाळात मदत कार्य याविषयी समितीतर्फे आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या समितीची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News