IGNO विद्यापीठाच्या विविध स्किल कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु; अशी करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 July 2020

मुक्त आणि दूरस्थ शिक्षण घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली जात आहे. पदविका, पदवी, पदव्युत्तर, स्किल कोर्स, प्रमाणपत्र कोर्ससाठी प्रवेश दिला जातो.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे यंदाच्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. मुक्त आणि दूरस्थ शिक्षण घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी केली जात आहे. पदविका, पदवी, पदव्युत्तर, स्किल कोर्स, प्रमाणपत्र कोर्ससाठी प्रवेश दिला जातो.

या तारखेपर्यंत नाव नोंदणी सुरु

कोर्सेसला नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. या पुर्वी इच्छूक उमेदवारांनी नाव नोंदणी करावी. पदविका कोर्सेससाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डामधून विद्यार्थी बारावी पास असावा. पदव्युत्तर पदवीला प्रेवश घेण्यासाठी विद्यार्थी पदवी पास असावा. सर्व कोर्सेसची फी आणि पात्रता वेगवेगळी आहे. प्रवेश घेण्यापुर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेश पुस्तीका अवश्य वाचावी.

विद्यार्थी मदत केंद्र

विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया संबंधित विद्यार्थी मदत केंद्र सुरु केले. विद्यापीठ संबंधीत सर्व माहिती ssc@ignou.ac.in किंवा ०११-२९५७२५१३, २९५७२३१४ या नंबरवर मिळू शकते. प्रवेश प्रक्रिया संबंधीत माहिती मिळवण्यासाठी csrc@ ignou.ac.in किंवा ०११- २९५७१३०१, २९५७१५२८ या नंबरवर संपर्क साधावा. विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर आणि प्रशिक्षण केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. 

अशी करा नोंदणी

विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या ignou.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे. विचारलेली सर्व माहिती भरावी. त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. त्यानंतर ज्या कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी अर्ज करावा.

प्रवेश प्रक्रिया

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने विविध कोर्सेससाठी एक प्रवेश पुस्तीका प्रकाशीत केली आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संतेकस्थळावर प्रवेश पुस्तीका उपलब्ध आहे. ही माहिती पुस्तीका पाहण्यासाठी येथे क्लिक करा. नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News