'टीईएस'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)...................................................
Wednesday, 26 August 2020

'टीईएस'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

'टीईएस'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे - लष्कराच्या सैन्य दलात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असणा-यांनी तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन सेवा सुरू करण्यात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असून  इच्छूक उमेदवारांनी ९ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

ही प्रवेश प्रकिया फक्त मुलांसाठी असून साधारण ९० जागा भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अर्ज करू शकतो. यासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयात ७० टक्के गुण आवश्यक आहेत.

या प्रवेश प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेची आवश्यकता नसून थेट  'सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या मुलाखती' (एसएसबी) देता येईल. यासाठी ठराविक मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.  www.joinindianarmy.nic.in

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News