एमएस बायोडाव्हर्सिटी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया सुरु; येथे मिळेल प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

जंगल भ्रमंती करुन निर्गाचा अभ्यास करणे आणि अभ्यास केलेल्या घटकांवर प्रयोगशाळेत संशोधन करणे अशा पद्धीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली.

पुणे : मानवाच्या अतिक्रमनामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सरकार, सामाजिक संस्था जनजागृतीचे काम करत आहेत. त्यात शिक्षण क्षेत्राने आता पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. नैसर्गीक घडामोडींचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी गरवारे महाविद्यालयाने 'एमएस बायोडाव्हर्सिटी' अभ्यासक्रम सुरु केला. या अभ्यासक्रमची प्रवेश प्रक्रीया १७ जुलै पासून सुरु होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची अर्ज करण्याचे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले. 

'एमएस बायोडाव्हर्सिटी' अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हा अभ्यासक्रम गरवारे महाविद्यालयात शिकवला जातो. पुणे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्यात प्रत्यक्ष जंगल भ्रमंती करुन निर्गाचा अभ्यास करणे आणि अभ्यास केलेल्या घटकांवर प्रयोगशाळेत संशोधन करणे अशा पद्धीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. 'एमएस बायोडाव्हर्सिटी' अभ्यासक्रमात पर्यावरणाशी संबंधीत वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र यांचा समावेश आहे. सध्या क्रेडीट कोर्सला मोठी मागणी आहे. पुणे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार काही क्रिडेट कोर्स निर्माण करुन देण्यात आले आहेत. त्यात पर्यावरणाची जागृती आणि कायदे, पर्यावरण आणि प्रसार माध्यमे, पर्यावरणऱ्हासाचा अहवाल, पर्यावरण प्रदूषण, वातावरण बदलाची कारणे इत्यादी क्रिडेट कोर्सचा समावेश 'एमएस बायोडाव्हर्सिटी'त करण्यात आला आहे.

प्रवेश प्रक्रीया आणि संधी

'एमएस बायोडाव्हर्सिटी' अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया २७ जुलै पासून सुरु होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्याक्रमासाठी प्रेवश घ्यायचा आहे त्यांना www.garwarecollege.mespune.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्तानुसार यादी जाहीर करुन प्रेवश दिला जाणार आहे. 'एमएस बायोडाव्हर्सिटी' अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर पर्यावरणपुरक पर्यटन, बायोडायव्हर्सिटी असेसमेंट अँड लँडस्केपिंग आणि पर्यावरण संबंधीत विविध क्षेत्रात करिअरची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:  www.mesbiodiversity.in    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News