ITI ची प्रवेश प्रक्रीया खोळंबली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आहे त्यात संकेतस्थळ चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट कॉफे बाहेर ताटकळत उभे रहावे लागले.

मुंबई :  एक ऑगस्ट पासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केली मात्र, अचानक प्रवेशाचे संकेतस्थळ शट डाऊन झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. पहिल्याच दिवशी आयटीआयची प्रवेश प्रक्रीया खोळंबल्यामुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या आहे त्यात संकेतस्थळ चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट कॉफे बाहेर ताटकळत उभे रहावे लागले. काही वेळानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने एक सुचना जाहीर केली. 'सायंकाळी सात नंतर प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ शटडाऊन झाले होते सात वाजता पुन्हा सुरू होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी सुरु करावी' अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

आयटीआय प्रवेश अर्ज https://admission.dvet.gov.in या पोर्टलवर भरण्याची सोय करुन देण्यात आली आहे. त्यासोबत डिजीटल स्वरुपात प्रवेश प्रक्रीयेची संपुर्ण माहिती उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांना माहितीची आवश्यकता आहे त्यांना पीडीएफ स्वरुपातील फाईल डाऊनलोड करुन घ्यायची आहे. 

आयटीआय प्रवेशाचे संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी आम्ही अनेक ट्रायल घेतला. त्यावेळी कोणतीही समस्या उद्धभवली नाही मात्र, प्रत्यक्ष संकेतस्थळ सुरू झाले तेव्हा अचानकपणे तांत्रिक बिघाड झाला. काही तासात टेक्निकल टीमने संकेतस्थळ सुरु केले. भविष्यात काही समस्या उद्भवली तर तात्काळ सोडण्यात येईल अशी ग्वाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपक सिंग कुशवाह यांनी दिली.

आयटीआय प्रवेशाचे ऑनलाईन फार्म सुरु झाल्याची माहिती मिळाली, पहिल्या दिवसी फार्म भरण्यासाठी इंटरनेट कॉफेवर गेले. मात्र प्रवेशाचे संतेतस्थळ सुरळीच चालत नव्हते. थोड्यावेळानी पुन्हा प्रयत्न केला मात्र फार्म भरल्या जात नव्हता.
-रुपेश गायकवाड, किनवट

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News