कॉलेजसाठी प्रवेश अर्ज भरण्याचं संकेतस्थळ धीम्या गतीने

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020
  • दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे, मात्र हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे, मात्र हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कॉलेज किंवा विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळ धीम्या गतीने चालत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच एक अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ७ ते ८ तास लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई विद्यापीठातील संलग्न कॉलेज आणि शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. २२ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाइन करण्याची मुदत आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थी अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु माहिती भरताना विद्यार्थ्य्यांचा अर्ज सेव्ह होत नसल्याचे विद्यार्थी सांगतात. 

एखादा अर्ज भरताना अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थी वर्ग नाराज आहे. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालय आणि कॉलेज यांची माहिती वेबसाईटवर नसल्याने विद्यार्थ्यांना ती गुगलवर शोधून भरावी लागते. अर्ज भरताना कोणती विद्यापीठं अनुदानित आहेत, तसेच कोणती विद्यापीठं विनाअनुदानित आहेत, याची माहिती संकेतस्थळावर दिली नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News