कुपोषण मुक्तसाठी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने उचलले हे कौतुकास्पद पाऊल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही आपल्याला नेहमी चित्रपटांमध्ये अभिनय आणि नृत्य करताना दिसते.
  • परंतु यावेळेस जॅकलिन फर्नांडिसने आपले सामाजिक भान लक्षात घेऊन आपल्या देशातील कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

मुंबई :- बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही आपल्याला नेहमी चित्रपटांमध्ये अभिनय आणि नृत्य करताना दिसते. परंतु यावेळेस जॅकलिन फर्नांडिसने आपले सामाजिक भान लक्षात घेऊन आपल्या देशातील कुपोषण नियंत्रणात आणण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. जॅकलिनने पालघर जिल्ह्यातील दोन गावांना दत्तक घेऊन त्यागावातील लोकांना कुपोषण मुक्त करण्याचे ठरवले आहे. या दोन गावांमध्ये पालघर तालुक्यातील पथराळी आणि जव्हार तालुक्यातील साकुर गावाचा समावेश आहे. जॅकलिनने ॲक्शन अगेन हंगर फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेसोबत पालघर जिल्ह्यातील गावांना कुपोषणमुक्त करण्याच्या प्रयत्नात हातभार लावण्याचे ठरविले आहे. तसेच कुपोषण मुक्तीच्या संकल्पनेत तिने ह्या फाऊंडेशन सोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. अनेकदा गाव खेड्यातील भागात कुपोषणाची समस्या अधिक जाणवते. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारा पोषणमूल्य आहार, अन्न न मिळाल्याने वा भूकमारीने माणसाच्या शरीरात अशक्तपणाची आणि आजारीपणाची परिस्थिती निर्माण होते.  कुपोषित व्यक्तीच्या शरीराची योग्य वाढ न झाल्यास अनेकदा त्यांचा मृत्यू देखील होतो.  

श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिने पालघर जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या गावात १५५० कुपोषितांना पोषक अन्नाचे वाटप केले जाणार आहे. प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या सर्व लोकांना पुढील तीन वर्षासाठी त्यांना आवश्यक असलेला सकस आहार दिला जाईल तसेच सकस पोषण आहार याविषयावर शिबीरं  देखील आयोजित केली जातील.  लहान बालके, स्तनदा, गरोदर माता यांकरीता या प्रकल्पा अंतर्गत पोषण आहार उपलब्ध केला जाईल. 

जगातील अनेक देशात कुपोषण ही एक भयंकर समस्या आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न असल्याचे जॅकलिनने म्हंटले. ॲक्शन अगेन हंगर फाउंडेशन यासंस्थेने त्यांच्या सोशल मीडियावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कोरोना काळात कुपोषणमुक्तीसाठी उचललेल्या कौतुकास्पद पाऊलाबद्दल तिचे धन्यवाद मानले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News