पाऊस पडत नाही तोपर्यंत आदित्य ठाकरे यांची ही योजना सुरु राहणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे
  • जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत छावणीवरील शेतकऱ्यांना शिवसेनेकउून महाप्रसाद देणार
     

सोलापूर: शेतकरी दुष्काळाचा भयानक सामना करत आहेत. राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण करू नये. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत छावणीवरील शेतकऱ्यांना शिवसेनेकउून महाप्रसाद देणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

दुष्काळपिडीत चारा छावण्यांतील शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेद्वारे अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. रविवारी सोलापूर जिल्ह्यातील 215 एकूण चारा छावण्यांमधील शेतकऱ्यांसाठी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते धान्य वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी गंभीर दुष्काळप्रश्नी शिवसेना खंबीर असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी वाईट मार्ग न पत्करता शिवसेनेला हाक मारावी असे आवाहन केले. 

शिवसेनेच्यावतीने राज्यात सामूहिक विवाह अभियान चालू आहेत. विविध ठिकाणी पाण्याचे टॅंकरही सुरु केले आहेत. आष्टी पोखरापूर योजना एक महिन्यात सुरु होईल. जेथे जेथे पाणी गरजेचे आहे तेथे शासकीय योजनेद्वारेपाणी देण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही आदित्य यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तानाजी सावंत, आमदार नारायण पाटील, संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, पदाधिकारी लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महेश कोठे, साईनाथ अभंगराव, हरिभाऊ चौगुले, भाऊसाहेब आंधळकर, पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, प्रकाश वानकर, अस्मिता गायकवाड, शाहू शिंदे, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, भीमाशंकर म्हेत्रे, उज्वला येलूर, शांता जाधव, विजय पुकाळे, विठ्ठल वानकर, बाळासाहेब गायकवाड, भारत बडुरवाले, बालाजी चौगुले, अमर पाटील, कुमुद अंकाराम, सुधाकर इंगळे महाराज, मनीष काळजे, गुरूशांत धुत्तरगावकर, शिवराज झुंजे, गुरुनाथ शिंदे, प्रसाद नीळ, अमर बोडा, शुभम घोलप, रोहित हंचाटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

"महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून राज्य शासनाच्यावतीने दुष्काळपीडित शेतकऱ्यांसाठी व जनावरांसाठी चारा छावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दुष्काळपीडित शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना सरसावली असून चारा छावण्यांमध्ये वास्तव्य करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार धान्य वाटप करण्यात येत आहे. छावणीतील शेतकऱ्यांना एक वेळचे जेवण आणि सकाळचा चहा देण्यात येणार आहे" 
- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News