आदित्य ठाकरे यांची मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असतानाच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची आज मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक झाली.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असतानाच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची आज मुंबई पोलिस आयुक्तांसोबत बैठक झाली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा सुरू होती. या वेळी अभिनेता अक्षयकुमारदेखील उपस्थित होता.

अक्षय कुमारने पोलिस कर्मचाऱ्यांना घड्याळे भेट देण्यासाठी, आदित्य ठाकरे आणि पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र असे असले तरी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे, आयुक्त परमवीर सिंह आणि अभिनेता अक्षयकुमार यांच्यातील बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबतच्या तपशिलाकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिस सक्षम असल्याचे ठणकावून सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News