आयपीएलच्या १३व्या सीजनमध्ये विराट कोहलीच्या संघात "आदित्य ठाकरे" ची एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • आयपीएलच्या १३व्या सीजनची सुरुवात ही मार्च महिन्यात होणार होती परंतु भारतात कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढल्यामुळे यंदाची आयपीएल क्रिकेट स्पर्धा ही यूएईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  • आयपीएलच्या १३व्या सीजनची घोषणा होताच खेळाडू आणि क्रिकेट रसिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई :-  आयपीएलच्या १३व्या सीजनची सुरुवात ही मार्च महिन्यात होणार होती परंतु भारतात कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढल्यामुळे यंदाची आयपीएल क्रिकेट स्पर्धा ही यूएईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आयपीएलच्या १३व्या सीजनची घोषणा होताच खेळाडू आणि क्रिकेट रसिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाची आयपीएल ही यूएईमध्ये होणार असून यासाठी मोजक्याच खेळाडूंना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली  खेळणाऱ्या आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघात मराठामोळ्या युवा खेळाडूची निवड करण्यात आली आहे. या युवा खेळाडूचे नाव आदित्य ठाकरे असून हा नागपूरचा राहणारा आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा हा नागपूरचा पोट्या एक उत्तम शैलीचा गोलंदाज आहे. 

गोलंदाज आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षात क्रिकेट जगतात होणाऱ्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. आदित्य ठाकरे याने २०१८च्या १८ वर्षांखालील युवा विश्वचषकातही आपल्या दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. आदित्यच्या गोलंदाजीमधील उत्तम कामगिरीमुळेच त्याला यावर्षी आरसीबीच्या संघात स्थान मिळाले असल्याचे माहिती मिळत आहे. 

मागील सहा महिन्यांन पासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे खेळाडूंचा सराव झालेला नाही. त्यामुळे यंदा यूएईत होणाऱ्या आयपीएल विश्वचषकासाठी सराव करण्याकरीता फलंदाजांना विविधता असणाऱ्या गोलंदाजांची आवश्यकता आहे. त्यामुळे फलंदाजांच्या सरावाची गरज ओळखून आदित्य ठाकरे या वेगवान गोलंदाजांची निवड विराट कोहलीच्या संघात करण्यात आली आहे. आदित्यची निवड ही तुर्ताच केवळ सरावासाठी झाली असली तरी सरावाच्या वेळी कर्णधार विराट कोहली आणि इतर प्रशिक्षकांना त्याची गोलंदाजी आवडल्यास आदित्यला आयपीएल सामन्यांनमध्ये ही खेळण्याची संधी मिळू शकते. 
गोलंदाज आदित्य ठाकरे हा केवळ २१ वर्षांचा युवक असून त्याने २०१७ मध्ये पारपडलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News