रंगपंचमी खेळण्याबाबात आदित्य ठाकरेंनी दिला सल्ला, पाहा काय म्हणाले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पर्यावरण पुरक होळी साजरी करावी यासाठी 'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री संजय बनसोडे' यांनी विधीमंडळाच्या सर्व सदस्यांना स्नेहपत्र लिहिले आहे. 

मुंबई: होळीच्या रंगात बेधुंद होणारी तरुणाई विविध कृत्रीम रंगाचा वापर करताना दिसते. कृत्रीम रंगामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होतो. दरवर्षी पर्यावरणाला घातक असलेले रंग वापरल्याच्या घटना समोर येत असतात यामुळे त्वचा आणि पर्यावरणाला देखील हानी पोहोचते. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पर्यावरण पुरक होळी साजरी करावी यासाठी 'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री संजय बनसोडे' यांनी विधीमंडळाच्या सर्व सदस्यांना स्नेहपत्र लिहिले आहे. 

बदलते पर्यावरण व हवामान लक्षात घेता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा व समाजापुढे एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी पत्रात लिहिले आहे. होळी पेटवण्यासाठी मोठ्या प्रणाणात लाकूड आणि ज्वलनशिल पदार्थांचा वापर केला जातो. झाडांची कत्तल करुन लाकड गोळा केली जातात. याकारणाने पर्यावरणास हानी पोहोचते व वायू प्रदूषण वाढते. त्यामुळे पर्यावरण पुरक होळी साजरी करण्याचे आवाहन पर्यावरण मंत्र्यांनी केले आहे.  

मंत्रालायात मिळणार नैसर्गिक रंग

मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात उद्यापासून रंगांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना नैसर्गिक रंग उपलब्ध होणार आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News