आदित्य ठाकरेंनी सर्व परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.
  • अशा परिस्तिथीत  विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, याकरीता सर्व परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करत पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना पत्र लिहिले.  

मुंबई :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्तिथीत  विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, याकरीता सर्व परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करत पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना पत्र लिहिले.  

विद्यापीठांसह अनेक संस्थांकडून परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. विद्यार्थी तसेच पालकांच्या हितासाठी पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून या पत्राची माहिती दिली. एक पेपर घ्यायचा म्हटले, तरी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह राज्य शासनाची यंत्रणा त्यात जुंपावी लागते. शिवाय, जगभरात जिथे शाळा, महाविद्यालये उघडली तिथे कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी यात तातडीने हस्तक्षेप करीत प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन परीक्षांसह सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलावेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

 

 

 

बहुतांश विद्यापीठांतील विद्यार्थांचे शैक्षणिक मूल्यांकन पूर्ण झालेले आहे. या मूल्यांकनात अंतिम परीक्षेला १० टक्क्यांपेक्षा जास्त महत्त्व नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या निकषानुसार परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना पास करता येईल. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून करण्याबाबत विचार करता येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News