शिवसेनेचे युवराज काँग्रेस युवराजांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 January 2020
  • महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींनी घेतलेली भेट हि सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतेय.शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे युवराज म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी यांची घेतलेल्या भेटीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे दिसून आले.
  • एकेकाळी याच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींवर अगदी खरमरीत टीका केली होती.राहुल गांधी यांनी सुद्धा शिवसेनेवर अगदी शेलक्या भाषेत टीका केली होती. 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ह्यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची भेट घेतली.

त्यांच्या निकटवर्तीयांना विचारले असता आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्रालय सांभाळत असून त्यांचा हा शासकीय दौरा असल्याचे  सांगितले. तसेच राहुल गांधी यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींनी घेतलेली भेट हि सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतेय.शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे युवराज म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी यांची घेतलेल्या भेटीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे दिसून आले. एकेकाळी याच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींवर अगदी खरमरीत टीका केली होती.राहुल गांधी यांनी सुद्धा शिवसेनेवर अगदी शेलक्या भाषेत टीका केली होती.

काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची संपूर्ण हयातच एकमेकांवर बोचरी टीका करण्यामध्ये गेली.परंतु महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणामध्ये झालेल्या बदलामुळे मात्र या दोन्ही नेत्यांना एकत्र यावे लागले आणि काँग्रेसच्या टेकूवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. यासर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची घेतलेली भेट  ह्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News