लग्नाविषयी आदित्य ठाकरेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 February 2020

व्हॅलेंटाईन डे निमित्त विद्यार्थ्यांनी 'प्रेमविवाह करणार नाही' अशी शपथ घेतली होती. अमरावती येथील एका शाळेत सामुहिक प्रार्थना घेऊन विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. याविषयी पत्रकारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना प्रश्न विचार?

व्हॅलेंटाईन डे निमित्त विद्यार्थ्यांनी 'प्रेमविवाह करणार नाही' अशी शपथ घेतली होती. अमरावती येथील एका शाळेत सामुहिक प्रार्थना घेऊन विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. याविषयी पत्रकारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना प्रश्न विचार? त्यावेळी ठाकरे म्हणाले, 'लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. कोणी कुणासोबत लग्न कराव आणि कोणत्या पद्धतीने कराव हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र, इतरांनी सल्ले देऊ नयेत आणि कुणावर बळजबरी करु नयेत' असा मोलाता सल्ला व्हॅलेंटाईन डे निमित्त तरुणाईला दिला. 

बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेंच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा दादर येथील शिवाजी मंदिरात आयोजित केली होती. यावेळी मुख्याध्यापकांशी विविध विषयांवर चर्चा केली. ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांच्यासोबतचा एक प्रसंग मंत्री ठाकरेंनी मुख्याध्यापकांना सांगितला.

माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांची भेट आदित्य ठाकरेंनी घेतली. त्यावेळी ब्लेअरला प्रश्न विचारला, 'तुमच्या आयुष्यातल्या सर्वांत महत्त्वाच्या 10 गोष्टी कोणत्या? त्यावर ब्लेअर म्हणाले, माझ्या आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्था सुधारणे, सुधारणे, सुधारणे. हे ऐकुण मी आश्चर्य चकीत झालो. विकसीत देशातही शिक्षणाला किती महत्त्व दिले जाते याची जाणीव ब्लेअर यांच्या बोलण्यातून झाली. तेव्हा पासून ब्लेअर यांना आदर्श मानतो' असे ठाकरे म्हणाले. 

महानगरपालिकेची शाळा देशातली सर्वात अव्वल बनवण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांनी परकीय भाषा शिकल्यानंतर कोणत्याही देशात जाऊन आपल नाव रोशन करु शकतील. शाळेचा रिजल्ट 100 टक्के लागण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहीजे. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागतील असा विश्वास ठाकरें व्यक्त केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News